Jalgaon News : जिल्ह्यात 140 ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच

Gram Panchayat Election
Gram Panchayat Electionesakal
Updated on

जळगाव : जिल्ह्यातील १२२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींचा आज निकाल जाहीर करण्यात आला. एकूण १४० ग्रामपंचायतींच्या निवडणूका होत्या. त्यातील १८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने १२२ ग्रामपंचायतीसाठी मतदान रविवारी (ता.१८) झाले होते.

जिल्ह्यातील १४ तालुक्यात निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार, त्यांचे समर्थकांनी जल्लोष केला. ग्रामीण भागात ढोल ताशांच्या आवाजाने सकाळपासून वातावरण निवडणूकमय केले हेाते. गुलालाची प्रचंड उधळण आज झाली. (People Appointed Sarpanch on 140 Gram Panchayats in District Jalgaon News)

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Gram Panchayat Election
Jalgaon News : महापालिका आयुक्तपदाच्या अधिकाराबाबत पुन्हा तारीख

गेल्या अनेक महिन्यांपासून इच्छुकांनी निवडणुकीची तयार केली होती. त्यात काहींना यश येऊन विजय मिळविला. काहींना पराजय स्वीकारावा लागला. विजयी उमेदवारांनी विजयाचा जल्लोष केला. राज्यात ‘भाजप-शिवसेना’ सत्तेत असताना भाजपने लोकनियुक्त नगराध्यक्ष, लोकनियुक्त सरपंचाची प्रथा सुरू केली होती.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ताच ती लोकनियुक्त नगराध्यक्ष, सरपंच निवड न घेता निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच, नगराध्यक्ष निवड सुरू झाली होती. आता राज्यात पुन्हा भाजप-शिंदे गटाची सत्ता आल्यानंतर लोकनियुक्त सरपंच प्रक्रिया सुरू झाली आहे.

Gram Panchayat Election
Jalgaon News : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींत वर्चस्वाचा भाजप- शिंदे गटाचा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why did Sangli ACB register a bribery case?
Residents have questioned the transparency of the process and warned of approaching higher authorities over the alleged procedural violations.
Maharashtra Gram Panchayat Election 2026 latest update
Automatic weather station installation in Ratnagiri
Marathi News Esakal
www.esakal.com