जळगावातील रस्त्यांबाबत सोमवारी मुंबईत या! पवारांची आयुक्तांना तंबी

‘अमृत’चे काम होईपर्यंत शहर खड्ड्यात ठेवणार का?
Ajit Pawar
Ajit Pawarsakal

जळगाव : जळगाव शहरातील अमृत योजनेमुळे शहरातील सर्व रस्त्यांची अवस्था दोन वर्षांपासून बिकट झाली आहे. याबाबत पुणे, मुंबईत येऊन अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. जळगावचे लोकप्रतिनिधीही तीच तक्रार करताहेत. ‘अमृत’चे काम आणखी दोन वर्षे होणार नसेल तर तोपर्यंत शहर खड्ड्यात ठेवणार का? अशा अनेक प्रश्‍नांची सरबत्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यावर केली.

लोकप्रतिनिधी, नागरिक खास जळगावच्या रस्त्याच्या समस्येबाबत मुंबईत येऊन तक्रार का करतात ? रस्ते अमृतच्या कामांमुळे रखडले, त्या कंत्राटदाराला समज द्या, अन्यथा ब्लॅक लिस्ट करा असे मंत्री पवार यांनी सांगितले. यावर आयुक्त कुलकर्णी यांनी सांगितले, की अमृतच्या योजनेत अटी अशी घातली आहे की अमृत योजनेचे काम सुरू असताना भुयारी गटारी कामे एकावेळी करावे.

Ajit Pawar
अकोला : २४ गावांमध्ये संभाव्य पाणीटंंचाई; ४३ उपाययोजना प्रस्तावित

दोन्ही कामे पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची कामे करावीत. गेल्या दोन वर्षांपासून अमृतचे काम सुरू आहे. मध्येच कोरोना संसगामुळे कामे रखडली. आतापर्यंत जळगाव शहरात ५९५ किलोमीटर अमृतची जलवाहिनी टाकण्यात आली. १७८ किलोमीटर काम अजून बाकी आहे. त्याला अजून दीड दोन वर्ष लागतील. तोपर्यंत रस्त्यांची कामे करता येणार नाही.

कामाच्या नियमात होणार बदल

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, असे कसे चालणार? आणखी दोन वर्षे काम झाले नाही तर रस्ते तयार न होणे योग्य नाही. यावर काहीतरी तोडगा काढायला हवा. तुम्ही कामे करताना एक- एक प्रभागात दोन्ही कामे केली असती, नंतर दुसरा प्रभाग घेतला असता, तर आज रस्त्याची समस्या आली नसती. यावर सोमवारी मुंबईत या, काय तोडगा काढता येईल याचा निर्णय घेऊ. वेळप्रसंगी कामांच्या नियमात बदल करू, असे पवारांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com