Latest Marathi News | मक्तेदारांनी आदेशाप्रमाणे कामे करावीत : आयुक्त देवीदास पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

Jalgaon News | मक्तेदारांनी आदेशाप्रमाणे कामे करावीत : आयुक्त देवीदास पवार

जळगाव : महापालिकेत आयुक्तपदाचा वाद असला, तरी आपल्याकडे प्रभार असल्यामुळे कोणतीही कामे थांबलेली नाहीत. आपल्याकडे येणाऱ्या फाईलींचा आपण निपटारा करीत आहोत. मक्तेदारांनी विकासाची कोणतीही कामे थांबवू नयेत.

मिळालेल्या आदेशाप्रमाणे मक्तेदारांनी कामे करावीत, असे स्पष्ट मत महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. (Commissioner Devidas Pawar Monopolist should work as per orders jalgaon news)

हेही वाचा: Jalgaon News : 400 वर जोडप्यांच्या ‘मनोमिलना’ त महिला कक्षास यश

महापालिकेत असलेल्या आयुक्तपदाच्या वादामुळे फाईलींवर स्वाक्षऱ्या होत नाहीत. त्यामुळे कामे ठप्प आहेत. तसेच बिले निघत नसल्याने मक्तेदारांनी कामे थांबविली असल्याबाबत चर्चा सुरू आहेत. याबाबत आयुक्त देविदास पवार म्हणाले, की काय चर्चा सुरू आहेत, याची आपणास माहिती नाही.

मात्र, आपल्याकडे आयुक्तपदाचा प्रभार आहे. त्यामुळे आपण नियमितप्रमाणे कामे करीत आहोत. ‘मॅट’ने आपल्याला काही निर्देश दिले आहेत. ते आपण पाळून कामे करीत आहोत. मात्र, कोणत्याही कामांच्या फाईल थांबविलेल्या नाहीत.

मक्तेदारांनी शहरातील कामे, बांधकाम व इतर विभागांनी दिलेली कामे करावीत. काम झाल्यानंतर बिलाची प्रक्रिया नियमानुसार होईल. त्यामुळे शहर विकासाची कोणतीही कामे थांबवू नयेत. त्यांनी त्यांचे काम करावे. महापालिका प्रशासन नियमानुसार आपले काम करेल. आपण प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांच्य बैठका घेऊन त्यांच्या विभागाची माहिती घेऊन कामांचे आदेश देत आहोत. आवश्‍यक तेथे जागेवर जाऊन पाहणीही करीत आहोत.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

हेही वाचा: Nashik Crime News : धोकादायकरीत्या गॅससिलिंडरची हाताळणी करणाऱ्या ‘त्या’ रिक्षाचालकावर गुन्हा दाखल

निर्बीजीकरण प्रक्रिया सुरू होणार

शहरातील कुत्रे निर्बीजीकरण करण्याबाबत आपल्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार आपण मक्तेदार नंदुरबारच्या नवसमाज संस्थेने कुत्रा निर्बीजीकरण सुरू केले आहे, त्या जागेवर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. संबंधित मक्तेदाराकडून माहितीही घेतली.

त्यामुळ मक्तेदाराच्या कामावर आपले समाधान झाले आहे. निर्बीजीकरण करण्याच्या प्रक्रिया सुरू करण्याबाबत त्यांना लवकरच आदेश देण्यात येतील, असेही आयुक्त पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: Nashik News : Hybrid Annuity रस्त्याचे काम थंडावले; कौळाणे- नांदगाव- येवला मार्गावरून खडतर प्रवास!