Jalgaon News : डीमार्ट रस्ते कामात सतराशे विघ्न; काँक्रिट झालेल्या रस्त्यावर पुन्हा फिरवला JCB

Excavated road near Shyama Fire and Paved cement road
Excavated road near Shyama Fire and Paved cement roadesakal

जळगाव : इच्छादेवी चौक ते डीमार्टपर्यंतच्या रस्ते (Road) कामाचा दर्जा, तांत्रिक बाबी आणि अतिक्रमणाबाबत वाद उपस्थित झाल्यानंतर आता महापालिकेचा या रस्त्याबाबत गलथान कारभार समोर आला आहे. (concrete road has been dug up by Municipal Corporation for sewage work in front of Shyama Fire jalgaon news)

काँक्रिटीकरण झालेला हा रस्ता श्‍यामा फायरसमोर महापालिकेने गटाराच्या कामासाठी खोदून ठेवला आहे. त्यामुळे हे काम आणखी महिनाभर लांबणार असल्याने नागरिकांचे हाल होणार आहेत.

अनेक वर्षांपासून इच्छादेवी चौक ते डीमार्ट रस्त्याचा विषय प्रलंबित आहे. गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीचाही हा मार्ग असल्याने संवेदनशीलता व महत्त्व ओळखून त्याची तात्पुरती डागडुजी त्या वेळी करण्यात आली. नंतर सातत्याने पाठपुरावा करूनही या रस्त्याची मालकी समजायला बराच कालावधी लागला.

कसाबसा या रस्त्याचा मालक सापडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्ते कामाची निविदा मंजूर होऊन अखेर काँक्रिटीकरणाचे कार्यादेश देण्यात आले. पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता असतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष बाब म्हणून त्यास मान्यता दिली.

कामासोबत वादही सुरू

अत्यंत दुरवस्था झालेल्या या रस्त्याच्या कामास गेल्या महिन्यात सुरवात झाली. शासकीय कंत्राटदार अभिषेक कौल यांच्या फर्मला या रस्त्याचे कंत्राट मिळाले असून, आता कामही सुरू झाले आहे. मात्र, या रस्त्याची रुंदी किती, त्यावरील कथित अतिक्रमण आणि त्यानुसार सुरू असलेल्या कामावर माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी आक्षेप घेतला.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

Excavated road near Shyama Fire and Paved cement road
Jalgaon News : फेब्रुवारीच्या वेतनासोबत तिसरा हप्ताही मिळणार; सैनिकी शाळा शिक्षकांना आयोगाचा लाभ

बांधकाम विभाग, महापालिका अभियंत्यांनी त्यांच्या परीने त्यांना कामाबाबत उत्तरे दिली. मात्र, तरीही कामाचा दर्जा व स्वरूप याबाबत प्रश्‍न निरुत्तरित राहिलेत.

कामात विघ्नांची मालिका

या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम एका बाजूने पूर्ण करत ते डीमार्टपर्यंत आले. मात्र, त्याठिकाणी रस्त्याच्या रुंदीवरून वाद उद्‌भवला. या भागातील काही नागरिकांनी रस्त्याचे काम रुंदीनुसार होत नसल्याची तक्रार श्री. खडसे यांकडे केली

आणि खडसेंनी त्यावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नंतर त्यात डीमार्टची संरक्षक भिंत अतिक्रमणात असल्याचा मुद्दा समोर आला. आता नेमके या भिंतीचे अतिक्रमण आहे का? रस्त्याची रुंदी किती, याबाबत अद्याप उत्तरे मिळालेली नाहीत.

कामानंतर खोदला रस्ता
रस्त्याच्या कामाचा व त्यालगतच्या अतिक्रमणाचा मुद्दा समोर आला असताना, महापालिकेच्या गलथान, भोंगळ कारभाराचा नमुना या रस्त्याच्या कामातही आडवा आला आहे. रस्त्याचे काम सुरू होऊन महिना झाल्यानंतर महापालिकेला जाग आणि या रस्त्यात श्‍यामा फायरसमोर गटार टाकायची राहून गेल्याचा साक्षात्कार झाला.

Excavated road near Shyama Fire and Paved cement road
Jalgaon News : डांगर शेतीतून खर्चही निघेना; बळीराजा चिंतेत

त्यामुळे काँक्रिट लेयर झालेला रस्ता महापालिकेने पुन्हा खोदून ठेवला असून, इच्छदेवी ते डीमार्टच्या टप्प्यात श्‍यामा फायरसमोर जवळपास ४०-४५ फुटाचा भाग सोडून हे काम पूर्ण करण्यात येत आहे. तेवढा भाग महापालिकेने आठ दिवसांपासून खोदून ठेवला आहे.

रस्त्याचे काम रखडले

गटाराचे काम बाकी असल्याने व त्यासाठी महापालिकेने ते खोदून ठेवल्याने ज्या एका बाजूने रस्त्याचे काम पूर्ण होऊन ते महिनाखेर सुरू करणे अपेक्षित होते, ते काम पुन्हा लांबले आहे.

आता या महिनाखेरपर्यंतही एक बाजू वाहतुकीस खुली होऊ शकत नसल्याने आणखी काही दिवस वाहनधारकांना त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे सामान्य जनतेतून मनपाच्या या भोंगळ कारभाराबाबत संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

‘त्या’ ठिकाणी ‘नो हॉकर्स झोन’ आवश्‍यक

अनेक वर्षांनंतर काँक्रिटीकरणाचे काम सुरू होऊन रस्त्याचे भाग्य उजळले आहे. मात्र, या रस्त्यावर डीमार्टजवळ तीन रस्त्यांचे जंक्शन आहे. डी- मार्टसमोर या अरुंद रस्त्यावर महापालिकेने त्यावेळी गरज नसताना मक्तेदाराच्या हितासाठी दुभाजक टाकून ठेवले.

Excavated road near Shyama Fire and Paved cement road
Jalgaon news : मोबाईलच्या अतिवापराने डोळ्यांचे विकार; संस्थेचे सर्वेक्षण

त्यामुळे या रस्त्यात प्रचंड पाणी साचून रस्त्याची वाट लागते. शिवाय रस्त्याच्या बाजूला डीमार्टच्या विरुद्ध दिशेला हातगाड्या लागून त्याठिकाणी गर्दी होऊन वाहतुकीचा बोजवारा उडतो. त्यामुळे आता या रस्त्याचे काम होत असताना, डीमार्टसमोरील दुभाजक तोडूनच तो रस्ता खुला करणे आवश्‍यक आहे.

हा संपूर्ण रस्ता ‘नो हॉकर्स झोन’ जाहीर करून त्याची अंमलबजावणी कठोरपणे करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया बांधकाम व्यावसायिक तथा क्रेडाईचे राज्य उपाध्यक्ष अनिश शहा यांनी व्यक्त केली.
दुभाजक काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

डीमार्टसमोरील रस्त्याती दुभाजकाचा विषय गेल्यावर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीतही चर्चेस आला होता. त्यावर हे दुभाजक त्याठिकाणी अयोग्य आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी असल्याचा अहवाल देत ते तातडीने काढण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्याचे सांगितले जाते.

Excavated road near Shyama Fire and Paved cement road
Market Committee Election : बाजार समिती निवडणुकीची नव्याने होणार मतदारयादी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com