Jalgaon News : डांगर शेतीतून खर्चही निघेना; बळीराजा चिंतेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pumpkin farm

Jalgaon News : डांगर शेतीतून खर्चही निघेना; बळीराजा चिंतेत

अमळनेर (जि. जळगाव) : मागील वर्षापेक्षा या वर्षी डांगर उत्पादन निम्यापेक्षा जास्तीने घट झाली असूनही भावात मात्र खूपच घसरण झाली आहे.

या वर्षी एकही शेतकऱ्याचे (Farmer) डांगर निर्यात झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्च निघनेही अवघड बनले आहे. (difficult for farmers to cover cost of cultivation pumpkin production jalgaon news)

गेल्या दोन वर्षांपासून डांगर फळ लागवडीत अमळगाव परिसरात फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली. दरवर्षी लागवडीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत होती. मागील वर्षापर्यंत डांगरला १८ ते २२ रूपये किलोप्रमाणे चांगला भाव मिळत होता. यामुळे शेतकऱ्यांनी यंदा लागवड क्षेत्रात वाढ केली.

परंतु डांगर फळझाडावर व्हायरस (पाने पिवळी पडणे आणि डांगर वेल पूर्णपणे खराब होणे) आल्याने शेतच्या शेत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. फळ काढणी योग्य होण्याआगेदरच भेगा पडल्याने फळ पूर्णपणे पक्व झाली नाही. परिणामी शेत बसून गेलीत.

अन् आठ ते दहा कोटीच्या जवळपास नुकसान झाल्याचे दोधवद, हिंगोणा, हिंगोणासिम, कलाली, निंभोरा, जळोद परिसरातील शेतकऱ्यांनी अंदाज वर्तविला आहे. या वर्षी लागवडीचे क्षेत्र तिनशे ते साडेतीनशे एकर होते आणि एकरी उत्पन्न म्हटले तर तीन लाखाच्या घरात येते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

काही शेतकऱ्यांनी बियाणे कपंनीलाच दोषी ठरवले असून, बियाणे कंपनीनेच खराब बियाने दिल्याची तक्रार कृषी विभागाकडे केल्याचे सागितले. परंतु या सगळ्या प्रकारातून मात्र शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. मात्र याबाबत अजूनही शासन दरबारी दखल न घेतल्याची खंत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

डांगर लागवडीची हिंमत केली, अन्...

खानदेशात कापूस, गहू, ज्वारी, मका यासारखी पारंपरिक पिकांकडे मोठ्या प्रमाणावर लागवड होती. डांगर, टरबूज यासारखी पिके घेण्याची हिंमत सहसा कुणी करत नाही. या पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तशी आपल्याकडे विरळीत म्हणावी लागेल.

मात्र, गेल्या हंगामात डांगराला बाजारात चांगला भाव मिळाल्याने अमळनेरच्या अमळगाव परिसरातील काही गावांमध्ये शेतकऱ्यांनी डांगराची लागवड केली. चांगले उत्पन्न येईल, या आशेवर शेतकरी होते. परंतु यंदा उत्पन्नही कामी आले अन् भावही नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

"आजच्या परिस्थितीत हवामान बदलामुळे उत्पन्न घटले असून, भावही मिळत नसल्यामुळे खर्च निघेनासा झाला आहे. शासनाने याबाबत ठोस भूमिका घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक करावी."

- सचिन पाटील, डांगर उत्पादक, वावडे, ता. अमळनेर

टॅग्स :JalgaonFarmerCrop Crisis