Jalgaon News : फेब्रुवारीच्या वेतनासोबत तिसरा हप्ताही मिळणार; सैनिकी शाळा शिक्षकांना आयोगाचा लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

payment

Jalgaon News : फेब्रुवारीच्या वेतनासोबत तिसरा हप्ताही मिळणार; सैनिकी शाळा शिक्षकांना आयोगाचा लाभ

अमळनेर (जि. जळगाव) : राज्यातील सैनिकी शाळेतील आदिवासी तुकडीवर कार्यरत शिक्षकांसह आठ लेखाशीर्षतील शिक्षकांना (Teacher) फेब्रुवारी २०२३ च्या ऑनलाइन वेतनासोबत सातवा

वेतन आयोगाचा तिसरा हप्ता देण्यात येणार आहे, (Benefit of Commission to Military School Teachers 3rd installment will be given along with February salary jalgaon news)

अशी माहिती शिक्षण उपसंचालक दीपक चवणे (अंदाज व नियोजन, पुणे) यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे. राज्यातील सर्व माध्यमिक शिक्षणाधिकारी व वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक यांना निर्देश देण्यात आले आहे. याबाबत राज्य सैनिकी शाळा कृती समितीने केलेल्या पाठपुरावाला यश आले आहे.

शासनाकडून उपलब्ध झालेल्या तरतूदीनुसार व १० फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत घेतलेल्या आढाव्यानुसार आठ लेखाशीर्षामध्ये माहे फेब्रुवारी २०२३ च्या वेतन व सातवा वेतन आयोगाचा राहिलेला पहिला, दुसरा हप्ता तसेच तिसऱ्या हप्त्यासाठी पुरेशी तरतूद उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. यासाठी फेब्रुवारी २०२३ चे वेतन देयके ऑनलाइन महागाई भत्त्यासह व सातव्या वेतन आयोगाचा पहिला, दुसरा व तिसरा हप्ता काढण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत.

राज्यातील सर्वसाधारण माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना सातवा वेतन आयोगाचा हप्ता मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. यात बऱ्याच शिक्षकांना तर पहिला हप्ताही मिळालेला नाही, तर काही शिक्षकांना दुसरा हप्ता द्यावा, असे शासन आदेश प्राप्त झाले आहेत.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

एकीकडे इतर शाळेसाठी अशी प्रतिकूल परिस्थिती असताना दुसरीकडे सैनिकी शाळा कृती समितीच्या प्रयत्नामुळे सैनिकी शाळामधील आदिवासी तुकडीवरील नियुक्त शिक्षकांना सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता मिळावा तसेच वैद्यकीय बिलही मिळावीत, यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

सैनिकी शाळेतील आदिवासी तुकडीवर नियुक्त असलेल्या शिक्षकांचे लेखाशीर्षवर अतिरिक्त निधी पडून होता. या निधीतून संबंधित शिक्षकांना सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता हा फेब्रुवारीच्या वेतनासोबत द्यावा, असे निर्देशित करण्यात आले.

यासाठी ॲड. अमित गीते, ॲड. नीलेश लोंढे यांच्यासह कृती समितीचे विनोद किंदर्ले (भंडारा) अजय धाबे, अभयराजे नंदन, शेखर भिंगारे, विशाल रगडे, दादासाहेब काशीद (औरंगाबाद) सुनील चौधरी, देविदास पाटील (पनवेल) उमेश काटे, टी. के. पावरा (जळगाव) यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.

या शिक्षकांना निधीअभावी केवळ वेतन

दहा फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत घेतलेल्या आढाव्यानुसार लेखाशीर्ष २२०२/०४४२, २२०२/०४७८, २२०२/३३६१, २२०२/३३७९, २२०२/०४६९ व २२०२/०५०२ या लेखाशीषांमध्ये १० फेब्रुवारी २०२३ च्या बैठकीतील आढाव्यानुसार सातव्या वेतन आयोगाचे हप्ते ऑनलाइन काढणे पर्याप्त तरतुदीअभावी शक्य नसल्याने फक्त फेब्रुवारी २०२३ नियमित वेतन देयक व महागाई

भत्त्याच्या फरकासह प्राधान्याने सर्व कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन काढण्यात यावे, त्यानंतर उर्वरित रकमेतून सातव्या वेतन आयोगाचे हप्ते ऑफलाइन काढण्याची कार्यवाही करण्यात यावी. नंतर त्याची शालार्थ प्रणालीमध्ये नोंद घेण्यात यावी. उपलब्ध तरतूद १०० टक्के खर्च होईल, याची दक्षता घ्यावी, असेही या शासन परिपत्रकात नमूद केले आहे.