Road Construction
Road Constructionesakal

Road Construction: दूध फेडरेशन रस्त्याची कथा, जिल्हा प्रशासनाची व्यथा; कागदी अहवाल मागविण्याच जातोय वेळ

Road Construction : शहरातील रेल्वे स्थानक ते दूध फेडरेशन रस्त्याच्या दुरूस्ती आता एक कथा झाली आहे, तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासन यांची हतबलतेचीही व्यथाच दिसून येत आहे.

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव निधी देण्यास तयार आहेत. जिल्हा प्रशासन केवळ कागदपत्रांचाच खेळ करीत आहे. यात या रस्त्याची अवस्था अधिकच खराब झाली आहे. या रस्त्यावरून आता वाहन चालविणेही कठीण झाले आहे. (condition of railway station to Dudh Federation road has worsened jalgaon news)

छत्रपती शिवाजी नगर भागाकडील रेल्वे स्टेशनपासून ते जिल्हा दूध फेडरेशनपर्यतच्या रस्त्याच्या दुरूस्तीबाबत निधी उपलब्ध आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांच्या बैठकीत या रस्त्याच्या कामाबाबतही चर्चा झाली मात्र अद्यापही हे काम सुरू करण्यात आलेले नाही.

रस्त्याची अवस्था बिकट

रेल्वे स्थानक ते जिल्हा दूध संघ रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. या रस्त्यावर डांबरीकरणासाठी टाकण्यात आलेली खडीही आता वर आली आहे. शिवाय अनेक ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले आहेत. आता या रस्त्यावरून वाहन चालवणेही कठीण झाले आहे. दुचाकीधारक तर अक्षरश: जीव मुठीत धरून वाहन चालवित असतात. चार चाकी वाहनधारकांनाही वाहन चालवितांना कसरत करावी लागत आहे.

राज्याचे सचिव निधी देण्यास तयार

महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी व राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव यांची व्ही.सी.झाली त्यात या रस्त्याच्या कामाबाबत चर्चा झाली असल्याचे सांगण्यात आले, विशेष म्हणजे जळगाव महापालिकेच्या प्रशासक व आयुकत डॉ.विद्या गायकवाड यांनी देखील या रस्त्याच्या कामाबाबत या व्ही.सी.त प्रश्‍न उपस्थित केला होता.

त्यांनी म्हटले होते, की, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ४२ कोटींच्या निधीतील शहरातील काही रस्ते आहेत, त्यांनी शहरातील अनेक रस्त्याचे काम अर्धवट सोडून दिले आहे. त्यांनी त्यावेळी या रस्त्याचा उल्लेखही केला होता. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांनी शहरातील रस्त्यासाठी दहा कोटींचा निधी पाठविण्याचीही तयारी दर्शविली.

Road Construction
Jalgaon News: खानदेशात येलक्की केळीचे क्षेत्र वाढतेय; शिरपूर, चोपडा, जामनेरमध्ये पसंती

त्यांनतर जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना शहरातील किती रस्त्याची कामे अपूर्ण आहेत. त्यांची काय स्थितीत याचा अहवाल मागविला होता. या आदेशाला आज पंधरा दिवस पूर्ण होवून गेली परंतु तरीही या रस्त्याचे काम अद्यापही सुरू झालेले नाही.

कागदपत्रांचा खेळ, जनतेचे काय?

जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शहरातील लेखी अहवाल मागविला, त्यांनतर या विभागाने अहवाल पाठविला.. परंतु अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही. जिल्हाधिकारी पुन्हा असाच कागदपत्रांचा खेळ करीत बसत असतील तर या रस्त्याचे काम नक्की कधी होणार हाच प्रश्‍न आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी आता अहवाल मागवित कागदपत्रांच्या खेळात न अडकता तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाला कामाचे आदेश द्यावेत. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अक्षरश: आता अनेक त्रास सहन करावे लागत आहे. प्रशासनाने आता त्याचाही विचार करावा.

जिल्हाधिकाऱ्यांनी एकदा पाहणी करावीच!

जिल्हाधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या कामाबाबत अनेक वेळा अहवाल मागविला, त्या रस्त्याबाबत व्ही.सी.व्दारे चर्चाही केली. परंतु एकाही वेळेस रस्त्याची पाहणी केलीनाही. त्यांनी एकदा या रस्त्याची पाहणी करावी, वाहनाने एकदा या रस्त्यावर यावेळी त्यावेळी त्यांना खऱ्या अर्थाने या रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची व्यथा कळेल.

Road Construction
Diwali Pollution: लक्ष्मीपूजनाला फटाक्यांमुळे प्रदूषणाची पातळी 212 टक्के; नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com