Jalgaon News: खानदेशात येलक्की केळीचे क्षेत्र वाढतेय; शिरपूर, चोपडा, जामनेरमध्ये पसंती

Banana
Bananaesakal

Jalgaon News : खानदेशात वर्षागणिक येलक्की केळीखालील क्षेत्र वाढत आहे. यंदा लागवड ३०० ते ३५० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात होईल, असे संकेत आहेत.

इल्लाकी केळीसाठी धुळ्यातील शिरपूरमधील तरडी, बभळाज भाग प्रसिद्ध आहे. तसेच चोपड्यातील वढोदा भागातही काही शेतकऱ्यांनी लागवड केली होती. जामनेर तालुक्यातही येलक्कीचे क्षेत्र वाढत आहे. जामनेरात सुमारे ५० हेक्टरवर येलक्की केळी आहे. (Yelakki banana area is increasing in Khandesh jalgaon news)

चोपड्यात यंदा हे क्षेत्र ८० ते ८५ हेक्टरवर पोहोचेल, असाही अंदाज आहे. शिरपुरातील क्षेत्रही ९० ते ११०० हेक्टरवर जाईल. तसेच नंदुरबारमधील शहादा, तळोदा, जळगावमधील जळगाव भागातहीयेलक्कीस काही शेतकरी पसंती देत आहेत.

२०२१ मध्ये अनेक शेतकऱ्यांनी येल्लाकी केळी लागवडीचा प्रयोग केला. त्यातील जीवनसत्त्वे व बाजारातील अधिकचे दर यामुळे या केळीस मोठा उठाव होता. नाशिक, पुणे भागातील काही कंपन्यांनी या केळीची थेट खरेदी शेतकऱ्यांकडून केली. मागील दोन वर्षे पाच हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर इल्लाकीस मिळाला आहे.

Banana
Jalgaon Agriculture News : दादा लाड तंत्रज्ञान कापूस पिकास नवसंजीवनी; खपाट गावी नागपूरच्या शास्त्रज्ञांची भेट

थंडीने बहरले तुरीचे पीक

तांदलवाडी (ता. रावेर) : मार्गशीर्ष महिन्याच्या अंतिम टप्प्यात गेल्या काही दिवसांपासून परिसरात थंडीची बऱ्यापैकी चाहूल लागल्याने या थंडीमुळे सध्या फुलोऱ्याच्या अवस्थेत असलेले तुरीचे पीक चांगलेच बहरत असून, रब्बीतील गहू, हरभरा या पिकांसाठीदेखील थंडी पोषक ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या फुलोऱ्याच्या अवस्थेत असलेले तुरीचे पीक तुरीच्या पिवळ्या फुलपाकळ्या मार्गाने जाणाऱ्या वाटसरुंचे लक्ष मन मोहून घेत आहेत.

दरवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. मात्र, तुरीला पोषक वातावरण असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. यंदा तुरीच्या उत्पादनात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. निसर्गाने साथ दिल्याने शेतातील तुर बहरली आहे. या थंडीमुळे तुरीची वाढ चांगली होऊन फुलधारणा चांगल्या प्रकारे होत आहे.

Banana
Banana Insurance: विमा कंपनी, सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने; दिवाळीपूर्वी भरपाईचे पोकळ आश्‍वासन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com