कॉंग्रेस कार्यकर्ते जोमाने काम करून भाजपला शह देणार : डॉ. उल्हास पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dr. ukhas patil

कॉंग्रेस कार्यकर्ते जोमाने काम करून भाजपला शह देणार : डॉ. उल्हास पाटील

जळगाव : कॉंग्रेसतर्फे (Congress) जिल्ह्यात नवसंकल्प अभियान राबविण्यात येणार आहे, याअंतर्गत प्रत्येक कार्यकर्ता दररोज २० किलोमीटर पायी चालणार आहे. त्यातून जनतेशी संवाद साधण्यात येईल. आगामी काळात कॉंग्रेसचे विद्यमान आमदार, माजी आमदार, खासदार तसेच पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने कार्य करून येत्या सर्व निवडणुकीत भाजपला (BJP) शह देतील, असा विश्वास माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

कॉंग्रेस भवनात गुरुवारी (ता. २६) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची जिल्हा प्रदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. कॉंग्रेसच्या उदयपूर येथे झालेल्या मेळाव्यातील घोषणापत्राची माहिती कार्यकर्त्यांना देण्यात आली. यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार शिरीश चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, उदय पाटील, युवक कॉंग्रेसचे देवेंद्र मराठे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर कोळी, प्रभाकर सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. उल्हास पाटील म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्तेस आठ वर्षे पूर्ण झाली आहे. मात्र त्यांच्या कार्यकाळात जनतेला महागाईची झळ सोसावी लागली तसेच बेरोजगारी व इतर समस्येलाही तोंड द्यावे लागले आहे. मात्र आता जनतेला कळाले आहे. त्यामुळे आता जनतेला आवाहन करण्यासाठी कॉंग्रसतर्फे ‘नवसंकल्प’ पदयात्रा काढण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार म्हणाले, की कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक उदयपूर येथे घेण्यात आली. या बैठकीत कॉंग्रेसचे घोषणापत्र तयार करण्यात आले आहे. त्याची अंलबजावणी आता जिल्हास्तरावरही करण्यात येणार आहे.

हेही वाचा: ‘म्हाडा’ पेपरफूट प्रकरणाचे जळगावात ‘खोदकाम’

हेही वाचा: KBCNMUच्या आवारात चोरट्यांचा धुमाकूळ; 4 लाखांचा ऐवज लंपास

Web Title: Congress Workers Will Work Hard To Defeat Bjp Dr Ulhas Patil Political News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top