Construction Site Death Case : लिफ्टचा पाइप डोक्यात पडल्याने मजुराचा मृत्यू

Death
Deathesakal

जळगाव : बांधकामाच्या साइटवर सहाव्या मजल्यावर बांधकाम साहित्य चढविणाऱ्या लिफ्टचा पाइप तुटून कोसळल्यामुळे प्रथमेश संतोष वाघ (वय २०, रा. खेडी खुर्द) या मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मेहरूण तलाव परिसरात घडली. त्याच्यासोबत काम करणारा दीपक जयप्रकाश पाटील गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

शहरातील मेहरूण तलाव परिसरात अनिश शहा यांच्या सहा मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बांधकामाच्या साइटवर प्रथमेश वाघ याच्यासह इतर मजूर काम करीत होते.

सहाव्या मजल्यावरील स्लॅब भरायचा असल्याने खालच्या मजल्यावरून सहाव्या मजल्यापर्यंत बांधकामाचे साहित्य चढविण्यासाठी सोमवारी मजुरांनी लाकडी बांबू व लोखंडी गंजलेल्या पाइपांच्या सहाय्याने लिफ्ट बनविली होती.(Construction Site Death Case Laborer died due to elevator pipe hits head Jalgaon news)

Death
Cricket Team : जळगाव जिल्ह्याचा प्राथमिक संघ जाहीर

बांधकामाचे साहित्य, सिमेंट व खडीची ट्रॉली भरून सहाव्या मजल्यावर पोचविल्यानंतर अचानक लिफ्टचा लोखंडी पाइप तुटून प्रथमेश व दीपक यांच्या डोक्यात कोसळला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असताना प्रथमेशची प्राणज्योत मालवली, तर दीपकची प्रकृती गंभीर आहे. प्रथमेशच्या मृतदेहाचे मंगळवारी सकाळी विच्छेदन करून कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी राकेश सखदेव बाविस्कर (रा. खेडी खुर्द) या तरुणाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत ठेकेदार भागवत सोनवणे, शिवा सोनवणे यांच्यासह बांधकाम ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे व हवालदार सचिन मुंडे तपास करीत आहेत.

Death
MLA Suresh Bhole Statement : प्रशासनाचे स्वच्छता,रस्ते समस्यांकडे दुर्लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com