‘एसडी सीड’ योजनेत अकरा लाखांचे योगदान | Jalgaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव : ‘एसडी सीड’ योजनेत अकरा लाखांचे योगदान

जळगाव : ‘एसडी सीड’ योजनेत अकरा लाखांचे योगदान

जळगाव : गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना ‘एसडी सीड’ या सुरेशदादा जैन यांच्या संकल्पनेतून आणि दातृत्वातून सुरू असलेल्या शिष्यवृत्ती योजनेत बाफना परिवाराने रतनलाल बाफना यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ११ लाख ११ हजार रुपये देत दातृत्वाचा प्रत्यय घडविला.

‘एसडी सीड’च्या माध्यमातून समाजातील अनेक दानशूर लोक ‘दत्तक पालक’ बनून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च उचलतात. त्यातून विद्यार्थ्यांचे आयुष्यच बदलून जाते. २००८ पासून आज पर्यंत १४ हजार ४०० विद्यार्थ्यांची सोनेरी स्वप्ने पूर्ण झालेली आहेत.

हेही वाचा: मल्टीमॉडेल हबमुळे नाशिक रोडच्या विकासाला मिळणार ऊर्जितावस्था

दिवंगत सामाजिक कार्यकर्ते रतनलालजी बाफना यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्ताने जळगावातील दातृत्वाचा मोठा वारसा लाभलेल्या बाफना कुटुंबियांनी या शिष्यवृत्ती योजनेत अकरा लाख रुपयांचा धनादेश समितीकडे सुपूर्त केला. याप्रसंगी श्रीमती नयनतारा बाफना, सुशीलकुमार बाफना , कस्तुरचंद बाफना, सज्जनराज बाफना, सिद्धार्थ बाफना, सुनील बाफना, अभयराज चोरडिया, मनोहर पाटील उपस्थित होते.

loading image
go to top