Jalgaon News : मायादेवी मंदिराला दुर्मिळ गोरख चिंचेची शीतल सावली; औषधीदृष्ट्याही उपयुक्त

Gorakh tamarind tree near Mayadevi temple.
Gorakh tamarind tree near Mayadevi temple. esakal

Jalgaon News : गोरख चिंच जगातील दुर्मिळ वृक्ष. भारत व‌ महाराष्ट्रातही तो अभावानेच आढळतो. औषधीदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे झाड शहरातही काही ठिकाणी दिसून येते.

सध्या महाबळ मार्गावर मायादेवी मंदिराचे नूतनीकरण सुरू असून, रस्त्याचे कामही प्रगतिपथावर आहे. त्यामुळे विकासकामांमध्ये या वृक्षाचा बळी जाऊ नये, अशी अपेक्षा परिसातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. (Cool shade of rare Gorakh Tamarind to Mayadevi Temple jalgaon news)

महाबळ मार्गावर प्रसिद्ध मायादेवी मंदिरालगत डेरेदार गोरख चिंचेचे वृक्ष आहे. रस्तेविकास व मंदिराच्या नूतनीकरणात या झाडाचा तसा तांत्रिकदृष्ट्या अडसर नाही, तरीही त्यावर कुऱ्हाड चालविण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हे झाड वाचविण्यासाठी काही वृक्षप्रेमींनी पुढाकार घेत झाडाचा बळी देण्याची गरज नाही, अशी भूमिका घेतली आहे.

गोरख चिंचेबद्दल थोडेसे...

या वृक्षाबाबत विचारले असता, चाळीसगाव येथील वन्यजीव व वनस्पती अभ्यासक राजेश ठोंबरे यांनी उपयुक्त माहिती दिली. मूलतः आफ्रिका खंड, अरबी द्विकल्प, मादागास्कर या भागात आढळणारी ही वृक्ष प्रजाती अरब आणि आफ्रिकन लोकांनी भारतात आणली.

भारतात या झाडाला गोरख इमली, रुखडो, ब्रह्मलिका, तर महाराष्ट्रात ‘गोरख चिंच’ या नावाने झाडाची ओळख आहे. यातील गोरख हा शब्द ‘गोरक्षी’ शब्दाचा अपभ्रंश दिसतो, तर फळ चिंचेप्रमाणे आंबूस म्हणून ‘चिंच’ ही उपाधी दिलेली आढळते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gorakh tamarind tree near Mayadevi temple.
Jalgaon News : आला..रे आला मन्या आला अन्‌ माफी मागुन गेला; वाळू माफियाचा बिंधास्त स्टंट

पानगळी उंच वृक्ष

या झाडाची उंची ५० फुटांपर्यंत होत असून, हा पानगळी वृक्षात मोडतो. झाडाचा बुंधा फारच मोठा असून, खोडाचा परीघ १०० फुटापर्यंतही असतो. झाडाची साल गुळगुळीत व करडी असते. पाने हस्ताकृती संयुक्त, लांब देठाची आणि मोठी दले असलेली असतात.

याचे फूल साधारणतः १५ सेटिंमीटर व्यासाचे, रंगाने पांढरे कक्षस्थ व लोंबते असते. फूल गळून तेथे जे फळ येते. ते आकाराने दुधी भोपळ्यासारखे किंवा नारळासारखे असते. फळाची साल मखमली, लवदार असून, वजन साधारणतः दीड किलोपर्यंत असते.

दमा, अतिसारावर गुणकारी

फळातला गर चवीला चिंचेसारखा असतो आणि त्यात व्हिटामिन ‘सी’ची मात्रा भरपूर असते. गराचे सरबत अतिशय शीतल असून, शरीरातला दाह आणि तृष्णा कमी करते. दमा, अतिसार आणि आव पडणे आदी विकारांवर ते गुणकारी आहे. फळाप्रमाणे झाडाची साल व लाकूडही अत्यंत उपयोगी आहे.

Gorakh tamarind tree near Mayadevi temple.
Unique Wedding : मुलगी बघायला आले आणि लग्न लावून गेले...!

दोर, गोणपाटही तयार होते

खोडाच्या अंतरसालापासून मजबूत दोर व गोणपाट तयार केले जाते. आंतरसाल उत्तम व टिकाऊ असल्यामुळे त्याचा वापर ब्राउन पेपर तयार करण्यासाठी होतो. झाडाचे लाकूड हलके असल्यामुळे गुजरातमध्ये मासेमारीसाठी या लाकडापासून होड्या तयार केल्या जातात.

‘मंकी ब्रेड ट्री’

बाँबेकेसी कूळ असल्यामुळे या वृक्षाला ‘बाओबाब’, तर माकडांना याची फळे आवडत असल्यामुळे या झाडाला ‘मंकी ब्रेड ट्री’ असेही म्हटले जाते. याचे शास्त्रीय नाव ‘ॲडॅन्सोनिया डिजिटाटा’. १८ व्या शतकात फ्रेंच निसर्ग शास्त्रज्ञ मायकेल ॲडन्सने या वृक्षाचे वर्णन केल्यामुळे त्याच्या सन्मानार्थ त्यास ‘ॲडॅन्सोनिया’ आणि हाताच्या बोटासारख्या खंडावरून जागतिक नाव ‘डिजिटाटा’ असे नाव देण्यात आले आहे.

Gorakh tamarind tree near Mayadevi temple.
Jalgaon Online Fraud : यू-ट्यूब Subscriptionच्या नावे 3 लाखांचा गंडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com