
सरत्या वर्षाला निरोप देताना पुन्हा दिवसभरात तब्बल ८० रुग्ण समोर आल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी झालेला नाही, हे स्पष्ट होत आहे.
जळगाव : सरत्या वर्षाला निरोप देताना जिल्ह्यात बुधवारी एकाच दिवसांत नवे ८० रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली असून जिल्हावासियांना सावधानतेचा इशाराही मिळाला आहे. गेल्या २४ तासांत तिघा रुग्णांच्या मृत्यूनेही खळबळ उडाली आहे.
आवश्य वाचा- १८० वर्षांची परंपरेचा रथोत्सव; कोरोनमूळे यंदा पाच पावलेच ओढला जाणार !
जळगाव जिल्ह्यात तीन- साडेतीन महिन्यांपासून कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे चित्र होते. दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत स्थिरता होती. मात्र, सरत्या वर्षाला निरोप देताना पुन्हा दिवसभरात तब्बल ८० रुग्ण समोर आल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी झालेला नाही, हे स्पष्ट होत आहे. या नव्या ८० रुग्णांमुळे एकूण रुग्णसंख्या ५५ हजार ७९५वर पोचली आहे. तर दिवसभरात ३६ रुग्ण बरे झाल्यामुळे बरे होणाऱ्यांचा आकडा ५४ हजार ३४वर गेला आहे.
तिघांचा मृत्यू
जिल्ह्यात कोरोना बळींचे प्रमाण कायम आहे. बुधवारी पुन्हा तीन रुग्णांचा बळी गेल्यानंतर बळींची संख्या १३२८वर पोचली आहे. विशेष म्हणजे हे तीनही बळी एकट्या भुसावळ तालुक्यातील ७० वर्षांवरील वृद्ध आहेत.
आवश्य वाचा- रेल्वे प्रवाशाचे प्राण वाचविणार्या रणरागिणीच्या पाठीवर कौतुकाची थाप
असे आढळले रुग्ण
बुधवारी जळगाव शहरात २७, चोपडा तालुक्यात १८, रावेरला १०, मुक्ताईनगर तालुक्यात १४, भुसावळला ६, जामनेर, पारोळा तालुक्यात प्रत्येकी २ रुग्ण आढळले.
संपादन- भूषण श्रीखंडे