
गेल्या २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, चोपडा शहरातील साठ वर्षाचा वृध्दाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बळींची संख्याही एक हजार ३३९ झाली आहे.
जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढल्याचे चित्र काही दिवसांपासून समोर येत आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून पॉझिटिव्हिटी रेट ६ टक्क्यांपेक्षा अधिक झाला असून, आज जळगाव जिल्ह्यात नवीन बाधिंताचा आकडा हा पन्नासी पार गेला आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याने पून्हा चिंता निर्माण झाली आहे.
आवश्य वाचा- दरोडा टाकणार तोच पोलिस दिसले; मग पळापळ आणि धरपकड
जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. यात जिल्ह्यातील अन्य तालुक्यांपेक्षा जळगाव शहरातील रुग्णसंख्या वाढत आहे. यात रविवारीही जिल्ह्यात आढळलेल्या ४१ रुग्णांमध्ये तब्बल २७ रुग्ण एकट्या जळगाव शहरातील होते. विशेष म्हणजे चाचण्या कमी होऊनही रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसतोय.
आज ५७ रुग्ण आढळले
आज जिल्ह्या नविन ५७ बाधित आढळल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५६ हजार ३७५ वर पोचली आहे. तर दिसभरात ४९ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा ५४ हजार ५३९ झाला आहे. गेल्या २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, चोपडा शहरातील साठ वर्षाचा वृध्दाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बळींची संख्याही एक हजार ३३९ झाली आहे.
आवश्य वाचा- गेलेले पैसे, दागीने परत मिळाले म्हणून आईच्या एका डोळ्यात आनंद; तर दुसऱ्या डोळ्यात मुलाचे दुःख !
असे आढळले आज रुग्ण
सोमवारी जळगाव शहरात २०, भुसावळ ५, अमळनेर ७, चोपडा ९, भडगाव ३, रावेर २, पारोळा २, चाळीसगाव४ तर जळगाव ग्रामीण, पाचोरा येथे प्रत्येकी एक असे रुग्ण आढळले.