महाराष्ट्राचे ग्रामस्थ आणि पेंट्रोलसाठी जावे लागते मध्यप्रदेशात; ते ही सव्वादोन रुपये अधिकचे मोजावे लागतात 

महाराष्ट्राचे ग्रामस्थ आणि पेंट्रोलसाठी जावे लागते मध्यप्रदेशात; ते ही सव्वादोन रुपये अधिकचे मोजावे लागतात 

 रावेर : महाराष्ट्रात अजूनही पेट्रोलच्या भावाने शंभरी गाठलेली नसली तरीही महाराष्ट्रातील मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या चोरवड आणि अजनाड आदी गावातील ग्रामस्थांना मात्र मध्यप्रदेशातील तुलनेने जवळ असलेल्या पेट्रोल पंपावर जाऊन सुमारे सव्वादोन रुपये प्रति लिटर जास्त खर्च करून पेट्रोल भरावे लागत आहे तर महाराष्ट्रातील अगदी शेजारी असलेल्या दोन वेगवेगळ्या पंपावर डिझेल व पेट्रोलचा वेगवेगळा भाव असल्‍याचे आढळून आले आहे.


जिल्ह्यातील रावेर - बर्‍हाणपूर रस्त्यावर रावेरपासून सुमारे 13-14 किलोमीटर अंतरावर चोरवड गावापलीकडे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची हद्द आहे. या हद्दीपासून मध्यप्रदेशमध्ये अवघ्या दोनशे मीटरवर लोणी गावाजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर काल सायंकाळी पेट्रोलचा भाव 100 रुपये 79 पैसे इतका होता तर डिझेलचा भाव 94 रुपये 24 पैसे इतका होता.

मध्यप्रदेशात शंभरीपार

महाराष्ट्रात अजूनही कुठेही पेट्रोलच्या भावाने शंभरी ओलांडली नाही. मात्र मध्यप्रदेशच्या सीमेच्याजवळ असलेल्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील चोरवड आणि अजनाड गावातील ग्रामस्थांना नाईलाजाने तुलनेने जवळ असलेल्या मध्यप्रदेशातील पेट्रोल पंपावर जाऊन सव्वा दोन रुपये जास्तीचे देत पेट्रोल भरावे लागत आहे. चोरवड गावापासून रावेरकडे सुमारे दहा किलोमीटर अंतरावर कर्जोद गावाजवळ दोन पेट्रोल पंप हाकेच्या अंतरावर आहेत. मात्र फक्त पेट्रोल भरण्यासाठी व लिटरमागे सव्वादोन रुपये वाचविण्यासाठी जाणे येणे धरून 20 किलोमीटर प्रवास करणे संयुक्तिक नसल्याने मध्यप्रदेश हद्दीत जाऊन नाईलाजाने महाग पेट्रोल भरावे लागत आहे.

सव्वादोन रुपयांनी पेट्रोल महाग
महाराष्ट्राच्या हद्दीतील कर्जोद येथे एका पंपावर पेट्रोलचा भाव 98 रुपये 72 पैसे तर डिझेलचा भाव 88 रुपये 15 पैसे इतका होता तर त्याच्या शेजारीच असलेल्या दुसऱ्या पंपावर पेट्रोलचा भाव 98 रुपये 54 पैसे तर डिझेलचा भाव 88 रुपये 21 पैसे प्रति लिटर असा होता.

संपादन- भूषण श्रीखंडे 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com