कोरोनाच्या २ हजार चाचण्यांमध्ये अवघे २७ जण बाधीत 

सचिन जोशी
Monday, 21 December 2020

जळगाव शहरात काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. क्वचित अपवाद वगळता दररोज पंधरा- वीसपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत.

जळगाव : जिल्ह्यात कोरोना तपासणीच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. रविवारी प्राप्त दोन हजार चाचण्यांच्या अहवालात केवळ २७ नवे रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात २८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. गेल्या २४ तासांत एकही मृत्यू नोंदवला गेला नाही. 

आवश्य वाचा-  पितृछत्राची उनीव..रागाच्या भरात घर सोडले अन पोहचली मुंबई

जळगाव जिल्ह्यात तीन महिन्यांपासून कोरोना संसर्ग काही प्रमाणात नियंत्रणात येत असल्याचे चित्र दिसत आहे. जवळपास तीन महिने काही अपवाद वगळता दररोज नवे बाधित कमी व बरे होणारे रुग्ण अधिक, असे चित्र समोर आले. प्रशासनाने आठवडाभरापासून चाचण्याही वाढविल्या आहेत. रविवारी जवळपास दोन हजारांहून अधिक चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. पैकी २७ नवे रुग्ण सापडले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५५ हजार ३५५ झाली आहे. तर २८ रुग्ण बरे झाल्याने बरे होणाऱ्यांचा आकडाही ५३ हजार ६८५वर पोचला आहे. 

मृत्यूदर कायम 
रुग्णांची संख्या काही प्रमाणात घटत असली तरी त्या तुलनेत जिल्ह्यातील मृत्यूदर कमी झालेला नाही. तीन-चार महिन्यांपासून तो २.३८ टक्क्यांच्या जवळपास कायम आहे. रविवारी मात्र एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. आतापर्यंत बळींची संख्या १३१७ आहे. मात्र, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ९६.९८ टक्क्यांवर पोचले आहे. 

आवश्य वाचा- चारशे वर्षानंतर योग..गुरु- शनिमधील 'महायुती'चा आज नजारा

जळगावात संसर्ग कायम 
जळगाव शहरात काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. क्वचित अपवाद वगळता दररोज पंधरा- वीसपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. रविवारी १४ नवे रुग्ण शहरात आढळले. अमळनेरला ३, भडगाव व धरणगाव प्रत्येकी २, चाळीसगाव ५, जळगाव गामीण १ असे रुग्ण आढळले. अन्य १० तालुक्यांत नवा रुग्ण सापडला नाही.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona test marathi news jalgaon twenty seven puerson positive