
जळगाव : कोरोनाची तिसरी लाट ओसरली
जळगाव: कोरोना महामारीची तिसरी लाट जिल्ह्यात ओसरल्यागत आहे. सोमवारी (ता. १४) केवळ बारा नवीन रुग्ण बाधीत आढळून आले होते. ‘आयसीयू’त दाखल रुग्ण केवळ चार आहेत. जिल्हा प्रशासनाने सतरा हजार बेडची तयारी करून ठेवली होती. आता केवळ पंधरा ते वीस रुग्ण ॲक्टीव्ह आहेत. रुग्णांची संख्या कमी झाल्याने कोरोना बाधीतावर उपचारासाठी लागणारा औषध साठाही कमी करण्यात आला आहे. हे ‘जीएमसी’ती शिल्लक साठ्यावरून दिसून येते. दुसऱ्या लाटेत ‘रेमडेसिव्हिर’नचा तुटवडा भासत होता. आता २५०० रेमडेसिव्हिर शिल्लक असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा: "ED च्या धमक्या देत शेकडो कोटी गोळा केले, सोमय्या जेलमध्ये जाणार"
कोरोना महामारीची पहिली लाट वृध्द, विविध आजार असलेल्या नागरिकांवर आली होती. सहव्याधी असलेल्यांना, वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला. तिसऱ्या लाटेतही ऑक्सिजनची गरज मोठी भासेल. यासाठी प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली. लहान मुलांना लसीकरण न झाल्याने ते अधिक संख्येने भाकीत वर्तविण्यात आले होते. मात्र तिसऱ्या लाटेत कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांना त्रास झाला नाही. रुग्ण संख्याही कमी होती. जिल्हा आरोग्य यंत्रणेत सतरा हजार बेड तयार करून आयसीयू वॉर्ड, तालुकास्तरावरील कोविड केअर सेंटर सुरू केले होते. तयारी जोमात केली. सुदैवाने तिसऱ्या लाटेत जिल्ह्यातील बाधीतांची संख्या दुसऱ्या लाटेएवढी मोठी झाली नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने रुग्ण संख्येत घट होत आहे. वाढ झाली तरी पाच ते दहाने होते. यामुळे ‘जीएमसी’ने औषधासाठा व इतर आवश्यक साधनांचा स्टॉकही कमी केला आहे. जो साठा पूर्वी मोठा होता.
हेही वाचा: मला जोड्याने मारा...किरीट सोमय्यांनी ऐन पत्रकार परिषदेत काढली चप्पल!
कमी करण्यात आलेले औषध व साठा
रेमडेसिव्हिर २७६३
मास्क १ लाख १२ हजार ७५
टोस्लिझूंब २४
एलएमडब्ल्यूएच २७४३७
बी लिपोसोमल १००
एमपीएस ७१५०७
हायड्रोकोर्ट ११८१४
सध्या अतिशय कमी रुग्ण बाधीत होताहेत. तिसरी लाट ओसरली असली तरी अजून पंधरा दिवस तरी रुग्ण संख्या कमी, जास्त होईल. नागरिकांनी मास्क वापरावे. हात सॅनिटायझरने वारंवार धुवावे.
डॉ. किरण पाटील,जिल्हा शल्यचिकित्सक
Web Title: Corona Third Wave Subsided
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..