
Jalgaon News : ‘मॅडम, मी अविश्वास प्रस्तावर सही केली नव्हती, माझा पाठिंबाही नव्हता’, असे एका नगरसेवकाने महापालिका आयुक्तांना दालनात येऊन सांगितले. त्यावेळी तेथे उपस्थित सर्व जण अवाक झाले.
नगरसेवकांनी मनपा आयुक्तांवर आणलेल्या अविश्वास प्रस्तावाचे गारूड आता अनेक दिवस सुरू राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. (corporators no confidence motion against jalgaon Municipal Commissioner dr Vidya Gaikwad case)
महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्यावर नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता. मात्र, तो तहकूब करण्यात आला. महापालिकेत नेहमीप्रमाणे कामे सुरू आहेत. आयुक्त, महापौर व उपमहापौर यांचे काम, तसेच बैठका सुरू आहेत व कामांचे आदेशही दिले जात आहेत.
नगरसेवकही आता आपल्या कामांसाठी येत आहेत. मात्र, पहिल्यासारखी नगरसेवकांची गर्दी मात्र दिसून येत नाही. अविश्वास ठरावानंतर काही ठारविक नगरसेवक आपल्या प्रभागातील कामांसाठी महापालिकेत येत आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
महापालिकेत आपल्या कामासाठी एक नगरसेवक आले होते. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या दालनात ते गेले. या वेळी तेथे उपायुक्त, अधिकारी व एक नगरसेवक बसले होते. या वेळी संबंधित नगरसेवकांनी आपले कामाचे कागद आयुक्तांच्या टेबलावर ठेवले.
आयुक्त कागद वाचत असताना, संबंधित नगरसेवक म्हणाले, की ‘मॅडम, मी अविश्वास प्रस्तावावर सही केली नव्हती, माझा त्याला पाठिंबाही नव्हता.’ त्यांचे हे वाक्य ऐकताच आयुक्तांसह दालनात उपस्थित असलेले सर्वच जण अवाक झाले व त्यांना हसूही आले.
आयुक्तांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी संबंधित नगरसेवकांच्या कामाबाबत आदेश दिल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.