कपाशीच्या निर्यातीला यंदा बसणार ‘ब्रेक’

कापूस उत्पादनाचा विचार करता भारतात तीन कोटी ४० लाख कपाशीच्या गाठींचे उत्पादन होते. त्यापैकी तीन कोटी २० लाख गाठी विविध प्रक्रियेसाठी भारतातच लागतील
Cotton
CottonSakal

जळगाव : यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे कपाशीचे उत्पादन चांगले येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. देशातील कापूस उत्पादनाचा विचार करता भारतात तीन कोटी ४० लाख कपाशीच्या गाठींचे उत्पादन होते. त्यापैकी तीन कोटी २० लाख गाठी विविध प्रक्रियेसाठी भारतातच लागतील, असा अंदाज असल्याची माहिती खानदेश जिनिंग प्रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी दिली.

पाऊस चांगला होत असल्याने पिकांना जीवदान मिळणार आहे. सध्या कपाशीला साडेसहा ते सात हजारांचा भाव आहे. कारण बाजारपेठेत कापूस नाही. बाजारात कापूस आल्यानंतर या दरात फरक पडणार नाही. यंदा शासकीय सीसीआय, पणन महासंघ कपाशीला सहा हजारांपर्यंत भाव देतील. व्यापारी मात्र साडेसहा हजारांचा दर देऊन शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करतील, अशी शक्यता आहे.

Cotton
हतनूर धरणातून ५८ हजार ६७५ क्यूसेकचा विसर्ग;२० दरवाजे उघडले

दुसरीकडे भारतात यंदा कापड निमिर्तीसह मेडिकल क्षेत्रात कपाशीला प्रचंड मागणी आहे. सूतगिरण्या, जिनिंगमध्ये कपाशीला मागणी राहील. यामुळे रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात होईल, असे सकारात्मक चित्र सध्या तरी आहे. मात्र, पावसावर सारे काही अवलंबून आहे. आगामी काळात पाऊस कसा पडतो, यावर हे सर्व गणित आहे.

सीसीआय, पणन महासंघाच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना हमीभाव मिळतो. मात्र, दोन ते तीन दिवस रांगेत उभे राहावे लागते. ऑनलाइन नोंदणीची अट, नंतर प्रत्यक्ष कापूस खरेदी केंद्रावर ग्रेडर मनमानीप्रमाणे कटती लावतात. त्यात आर्थिक नुकसान होते. यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांना दोन पैसे कमी दराने कापूस देतात व लागलीच त्याचे पेमेंटही घेतात. शासकीय कापूस खरेदीत शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीवर उपाययोजनांची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

आकडे बोलतात...

  • * जिल्ह्यातील कपाशीचे क्षेत्र : पाच लाख ५० हजार ३८ हेक्टर

  • * बागायती कपाशी : दोन लाख ११ हजार १३६ हेक्टर

  • * जिरायती कपाशी : दोन लाख २४ हजार १७५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com