Jalgaon News : पोलिस गस्त कागदावर, गुन्हेगार रस्त्यावर!

Crime News
Crime Newsesakal

जळगाव : शहरात वाढत्या गुन्हेगारीसोबतच चोऱ्या, घरफोडीच्या गुन्ह्यांत दिवसागणीक वाढ होत आहे. चाकू हल्ले, खून, हाणामाऱ्या आता किरकोळ गुन्ह्यात मोडावेत, अशा पद्धतीने होत आहेत. वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांचा संपलेला वचक, अवैध धंद्यांमध्ये भागीदार, पोलिसांची खात्यातील वरचढ होणारी लॉबीचा दुष्परिणाम पूर्ण पोलिसांवर होऊन पैसा कमावणारे पोलिस वाढल्याने केवळ ड्यूटी करणारे कर्मचारी पोलिस खात्यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

पोलिस ठाणे पातळीवर आवश्यक जनरल ड्यूटी, टपाल, गार्ड, ऑफीस हजर, नियमित गस्तीसाठी पोलिस मिळेनासे झाले आहेत, तर दुसरीकडे पोलिस ठाणे प्रभारींच्या गस्तीचा पायंडाच मोडीत निघाला आहे. (crime increase but police only write complain never take action on crime case jalgaon news)

Crime News
Nashik News : वर्षभरापासून साफसफाईची प्रतीक्षा; सप्तशृंगी माता उद्यानाची दयनीय अवस्था

जळगाव उपविभागात कुमार चिंथा यांची बदली झाल्यानंतर होम डीवायएसपी संदीप गावित यांच्याकडे उपविभागाचा पदभार आहे. श्री. चिंथा गेल्यापासून निर्धास्त झालेले अवैध धंदेवाईक असो, की सराईत गुन्हेगारांचा उपद्रव वाढू लागला आहे. दुचाकी चोरी, घरफेाड्या, भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सोबत गस्त ढेपाळल्याने नागरी वस्त्यांमध्ये रात्री दहानंतर मोकाट गुन्हेगारांच्या जत्रा भरू लागल्या आहेत.

शहर संवेदनशील नाही
रेकॉर्डवर संवेदनशील असलेले जळगाव शहर सध्यातरी पोलिस अधिकाऱ्यांना आणि प्रभारी निरीक्षकांना संवेदनशील नसल्याचे वाटते. कारण त्यांना स्वतःला गुन्हे थांबविण्यासाठी काम करायचेच नाही. घडलेल्या गुन्ह्यांना बर्कींग करणे, छोट्या-मोठ्या तक्रारींची वेळीच दखल न घेणे यातूनच मोठे गुन्हे होत आहेत. स्टेट बँक चौकात झालेला गोळीबार असो, की लॉटरी गल्लीत झालेल्या टोळी युद्धातील खून.

आस्थापना बंद करणे म्हणजे गस्त नव्हे?
प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुकाने, व्यवसाय रात्री साडेदहानंतर बंदचे आदेश आहेत. गस्तच ढेपाळल्याचे प्रमुख कारण म्हणजे रात्री साडेदहाला आस्थापना बंद करण्यास निघालेले वायरलेस वाहन भटकून आले की झाली गस्त, असा पायंडा पोलिस ठाण्यांनी पाडला आहे. परिणामी, रात्री अकरा ते पहाटे पाचपर्यंत गस्तीसाठी नियुक्त बीट मार्शल वेळेवर डायरीवर सीसीटीएनएस एंट्री करतात. मात्र, अस्थापना बंदच्या गाडीतून फिरून आल्यानंतर पोलिस ठाण्यात टंगळमंगळ करून ठाणे अंमलदाराला (काही घडल्यास) मोबाईलवर फोन करण्याचे सांगून थेट घरचा रस्ता धरला जातो, अशी अवस्था सर्व सहा पोलिस ठाण्यांची झाली आहे.

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

Crime News
Jalgaon News : सात तालुक्यांत मुलींच्या संख्येत घट; PCPNDT बैठकीत माहिती उघड

प्रभारींच्या गस्तीवर गाडी
प्रत्येक पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याला आठवड्याला एक डिव्हिजन गस्त आणि एक हद्दीची गस्त बंधनकारक असते. तसेच आठवड्याच्या सातही दिवस प्रभारींनी त्यांच्या हद्दीतील नियमित फेरफटकाही कुठलाच प्रभारी आजमितीस मारताना आढळत नाही. सोयीनुसार डिव्हीजन गस्त उरकली जाते, तर स्वतःच्या पोलिस ठाण्याच्या हद्दीच्या गस्तीला वाहनचालक पिवळा दिवा अन्‌ सायरन वाजवत एकटाच भटकतो. पहाटे पाच वाजले, की तोही पोलिस ठाण्यात गाडी लावतो अन्‌ आडवा होतो.

गस्तीच्या अर्थाचा अनर्थ...
कोरोना काळात आणि तत्पूर्वीही प्रत्येक पोलिस ठाण्याच्या वायरलेस व्हॅनसह बीट मार्शल आणि मुख्यालयातील राखीव पोलिसांच्या दुचाकी रात्रभर गस्तीवर असायच्या. नागरी वस्त्यांमध्ये रात्री टार्गेट तरुणांचे घोळके बसणाऱ्या ठिकाणांवर पोलिस आले की धावपळ माजायची. आता मात्र गस्तीचे पोलिस या टोळक्यांसोबतच बिड्या फुकतात नाही, तर गुटखा चघळत थांबून असतात. ठराविक अड्ड्यांवर या पोलिसांसाठी रात्रीच्या चहापानाचीही सोय असते.

आहे ना... ११२ बघतील
पोलिस दलातर्फे ११२ हा फास्ट डायल २४ तास सुरू आहे. बहुतांश नागरिक अपघात असो, की किरकोळ तक्रारी मोबाईलवरून ११२ ला कॉल करतात. सॅटेलाइटद्वारे जवळ असलेले वाहन ती तक्रार ॲटेंड करते. परिणामी, रात्र गस्तीच्या कर्मचाऱ्यांचे ते दडपणही आता दूर झाले आहे. जीपीआरएस सेट असलेल्या वायरलेस वाहने एकट्या चालकाला किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला घेऊन फिरतात. त्यांना टवाळखोर व गुन्हेगारांचे अड्डे दिसत नाहीत. ते फक्त तक्रार ॲटेंड करण्यापुरते काम करतात.

Crime News
Nashik Crime News : सिन्नरला दुचाकी चोरटे गजाआड

वर्षातील गुन्हे दृष्टीक्षेपात..
घरफोड्या : ९०
एकूण चोऱ्या ः ४६७
दुचाकी चोरी ः २४३
मोबाईल चोरी ः ४१
खून ः १८
दंगल ः ३५
सदोष मनुष्यवध ः ३
खुनाचा प्रयत्न ः १७
बलात्कार ः १०
विनयभंग ः ३५
दरोडे ः ५
जबरी चोरी ः ५५
चैनस्नॅचिंग ः १०
मोबाईल हिसकवणे ः २८

Crime News
Nashik News : कॅट स्पर्धेत नाशिकच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com