Jalgaon News : सात तालुक्यांत मुलींच्या संख्येत घट; PCPNDT बैठकीत माहिती उघड

Jalgaon: Dr. while speaking at the meeting of the Advisory Committee on Pregnancy Prevention. Kiran Patil. Officers of neighborhood committee
Jalgaon: Dr. while speaking at the meeting of the Advisory Committee on Pregnancy Prevention. Kiran Patil. Officers of neighborhood committeeesakal

जळगाव : जिल्ह्यातील मुला-मुलींच्या जन्माचे प्रमाणे ९३१ वरून ९१८ झाल्याबाबत चिंता व्यक्त करून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जिल्ह्यात अधिक सक्षमतेने जनजागृती करण्याचा निर्णय जिल्हा रुग्णालयात शनिवारी (ता. २४) झालेल्या गर्भलिंग निदान प्रतिबंधक (‘पीसीपीएनडीटी’) जिल्हा सल्लागार समितीच्या सभेत घेण्यात आला.

मुलींचा जन्मदर कमी झाल्याची माहिती सभेत देण्यात आली.दरम्यान, जिल्ह्यातील अमळनेर, बोदवड, जामनेर, चोपडा, रावेर, पारोळा, पाचोरा या तालुक्यांत जन्मदर कमी झाला आहे. (Decrease in number of girls in seven Taluka Disclosure of information in PCPNDT meeting Jalgaon News)

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

Jalgaon: Dr. while speaking at the meeting of the Advisory Committee on Pregnancy Prevention. Kiran Patil. Officers of neighborhood committee
Jalgaon News : रस्त्याचा प्रश्‍न विधिमंडळातही गाजला; पण दुरुस्ती कधी?

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील अध्यक्षस्थानी होते. जिल्हा सल्लागार समितीचे सदस्य विधी तज्ज्ञ ॲड. संभाजी जाधव, शासकीय रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नम्रता गोलेच्छा, बालरोग तज्ज्ञ डॉ. अमोल शेठ, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गोसावी, ज्येष्ठ पत्रकार शांताताई वाणी, निवेदिता ताठे, रुग्णालयातील ॲड. शुभांगी चौधरी, संजय पाटील आदी उपस्थित होते. जिल्हाभरातील नूतन व नूतनीकरणासाठी कायदेशीर बाबी व वैद्यकीय सूचना, नियम परिपूर्ण केले आहेत, अशा सोनोग्राफी, टुडी ईको, सिटी स्कॅन सेंटर आदींना मान्यता देण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

मुलींचा दर कमी झाल्याने तो वाढविण्यासाठी जनजागृती हाच उपाय आहे. यामुळे गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यानुसार सर्वच सोनोग्राफी सेंटरची तपासणी अधिक कडक करण्याचा निर्णय झाला. जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जनजागृतीची गरज असल्याने समितीच्या सदस्यांनी इतर सामाजिक संस्था, लोकसहभागातून कार्य करावे, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.

Jalgaon: Dr. while speaking at the meeting of the Advisory Committee on Pregnancy Prevention. Kiran Patil. Officers of neighborhood committee
Jalgaon News : सोन्याच्या दरवाढीचा उच्चांक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com