चक्क ! कृषी उत्पन्न बाजार समितीत बहरला सट्टा बाजार; पोलिसांचा छापा

रईस शेख
Thursday, 7 January 2021

चार जण बेकायदेशीर सट्टा व जुगार खेळ असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना मिळाली

जळगाव -ः शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात जुगाराच्या अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने छापा टाकून ३७ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आवश्य वाचा- शर्टवर भस्म टाकताच शेतकऱ्याला भुरळ आली; क्षणात डिक्‍कीतून कर्जाचे पैसे लंपास   
 

शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील जावेद टायर पंचर दुकानाच्या मागे मोहित मेन्स पार्लरच्या भिंतीला लागून चार जण बेकायदेशीर सट्टा व जुगार खेळ असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना मिळाली त्यानुसार बुधवार ६ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पथकाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला कारवाई करून संशयित आरोपी पंढरीनाथ भोजू हटकर (वय-४८) रा. म्हसावद (ता.जि.जळगाव), राजू गजानन पाटील (वय-२४) रा. रामेश्वर कॉलनी, रामभाऊ निना पाटील (वय-५३) रा. रामेश्वर कॉलनी या तिघांना ताब्यात घेतले. तिघांची अंगझडती घेतली असता ६ हजार ४३० रूपये रोख आणि ३० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल असा एकुण ३७ हजार ४३० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

वाचा- चोपडा तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी; आजी-माजी नेत्यांच्या गावांत प्रतिष्ठा पणाला 
 

यांनी केली कारवाई 
सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकातील उपनिरीक्षक सुनिल पाटील, किरण धमके, राजेश चौधरी,महेश महाले,रविंद्र मोतीराया, रोहिदास आगोणे, गोपाल पाटील, अनिल खोंदले, अभिषेक पिसाळ यांनी कारवाई केली. 
 
संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime marathi news jalgaon gambling agricultural produce market committee action