दारूची नशा झिंगली; आणि स्वतःच्या पोटातच खुपसला चाकू 

रईस शेख
Monday, 4 January 2021

दोघे काका-पुतण्याची बऱ्यापैकी मैत्री असल्याने दोघे भाजीपाला विक्रीसह दारूही सोबतच पित होते. घटनेच्या दिवशी दोघांनी दिवसभर भाजीपाला विक्री केली.

जळगाव ः  येथील खेडी (ता. जळगाव) येथील ५५ वर्षीय भाजी विक्रेत्याला पोटात चाकू खुपसलेल्या अवस्थेत जिल्‍हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना अर्ध्या तासातच त्याचा मृत्यू झाला. खुनाच्या शक्यतेने पोलिसांनी तपासाला गती देत, चौकशीला सुरवात केली. मात्र, वैद्यकीय अहवालावरून त्याने स्वतःच चाकू मारून घेतल्याचे स्पष्ट झाले. 

खेडी येथे लक्ष्मण पाटील हा भाजी विक्रेता घरात एकटाच वास्तव्यास होता. त्याचा पुतण्या ज्ञानेश्‍वर पाटील आणि लक्ष्मण असे दोघेही सुरत (रा. गुजरात) येथे कामाला होतो. लॉकडाउनमुळे काका पुतण्याला जळगावी परतावे लागले. खेडी येथील घरात लक्ष्मण पाटील राहत होता. तर ज्ञानेश्‍वर त्याच्या पत्नीसह शेजारीच राहत होता.

 

काका पुतण्याने पिली दारू

दोघे काका-पुतण्याची बऱ्यापैकी मैत्री असल्याने दोघे भाजीपाला विक्रीसह दारूही सोबतच पित होते. घटनेच्या दिवशी दोघांनी दिवसभर भाजीपाला विक्री करून सायंकाळी दारू प्राशन करत घर गाठले.

 

आणि दारू नशेत खुपसला चाकू

 

काका लक्ष्मण त्याच्या घरात व पुतण्या त्याच्या घरात असताना लक्ष्मणने दारूच्या नशेत स्वतःच्या पोटात चाकू खुपसून घेतला. दुसऱ्यांदा खुपसणार इतक्यात पुतण्या ज्ञानेश्‍वरने हात धरला. अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime marathi news jalgaon lives lost alcoholic vegetable seller