esakal | चोर पूढे...पोलिस मागे, असा तीन दिवसांपासून सुरू होता खेळ; अखेर पोलिसांची सरशी  ​
sakal

बोलून बातमी शोधा

चोर पूढे...पोलिस मागे, असा तीन दिवसांपासून सुरू होता खेळ; अखेर पोलिसांची सरशी   ​

संशयितांची नावे निष्पन्न होताच, तांत्रिक माहिती आणि संशयितांचा माग घेत गुन्हेशाखेचे पथक आणि एमआयडीसी पोलिसांनी पाठलाग सुरू केला

चोर पूढे...पोलिस मागे, असा तीन दिवसांपासून सुरू होता खेळ; अखेर पोलिसांची सरशी  ​

sakal_logo
By
रईस शेख

जळगाव : पंचमुखी हनुमान मंदिराजवळ दुचाकीवरून १५ लाखांची रोकड घेऊन जाणाऱ्या दोघांना पिस्तुलाचा धाक दाखवत रोकड घेऊन फरारी होणाऱ्या दोन्ही गुन्हेगारांना पोलिसांनी उल्हासनगरातून अटक केली. घटनास्थळावरूनच गुन्हे शाखा अन्‌ एमआयडीसीचे पथक संशयितांचा माग काढत जळगाव, धुळे, सुरत आणि नंतर उल्हासनगरात धडकले. चोर पुढे पोलिस मागे... असा खेळ होत अखेर पोलिसांनी दोघा भामट्यांची गचांडी धरत जळगावला आणले. 

आवर्जून वाचा- जळगाव शहरात लवकरच स्वयंचलित प्रदूषण नोंद यंत्रणा 
 


प्रभा पॉलीमर कंपनीचे महेश भावसार (वय ५३) आणि संजय विभांडिक (५१) असे १ मार्चला दुपारी आर. कांतिलाल जोशी पेठ मटण मार्केटसमोर या हवाला ट्रेडर्सकडून १५ लाख रुपये घेत गणपतीनगरकडे जाण्यासाठी निघाले होते. यातील महेश भावसार यांच्याकडे रोकड होती. पद्मावती मंगल कार्यालयासमोरच अज्ञात लुटारूंनी विनानंबरच्या दुचाकीने भावसार यांना खाली पाडून झटापट करुन पिस्तूल रोखत रोकड लांबविली होती. चोरट्यांची पल्सर सुरू झाली नसल्याने ती त्यांना जागेवरच सोडून पळ काढावा लागला होता. तेथूनच पोलिसांना तपासाचा धागा गवसला. अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी गाडीमालक धुळ्याचा असल्याचे निष्पन्न होताच धुळे पेालिसांकरवी संशयितांचे नाव तासाभरात निष्पन्न केले. 

घटनास्थळावरूनच पाठलाग सुरू 
संशयितांची नावे निष्पन्न होताच, तांत्रिक माहिती आणि संशयितांचा माग घेत गुन्हेशाखेचे पथक आणि एमआयडीसी पोलिसांनी पाठलाग सुरू केला. जळगावहून धुळे पोचल्यावर तेथे संशयिताचा मित्र दीपक सोनार याला ताब्यात घेतले. त्याने सुरतचा मार्ग दिला. सुरत पोचल्यावर अवघ्या अर्ध्याच तपासापूर्वी दोघांना भिवंडी बसमध्ये बसवल्याचे आवेज शहा याने पथकाला सांगितले. पथकाने भिवंडीनंतर उल्हासनगर गाठत दुपारीच गुन्हेशाखेने खुशाल मोळक व विकी ऊर्फ रितीक राणा (दोन्ही रा. मोहाडी ता. जि. धुळे) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून साडेनऊ लाखांची रोकड जप्त करण्यात आली असून, दोघांना घेऊन पथक जळगावकडे निघाले. 

आवर्जून वाचा- शहरापासून दूर असलेल्‍या वृद्धाश्रमातही पोहचला कोरोना
 

यांचे पथक मागावर 
निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक स्वप्नील नाईक, संजीव हिवरकर, रवी नरवाडे, संतोष मायकल, भरत पाटील, राजेश मेंढे तर दुसऱ्या पथकात अतुल वंजारी, इम्रान सय्यद, हेमंत कळसकर, सुधीर साळवे यांचा समावेश होता. 


मोकळची अशी होती प्लॅनिंग 
अटकेतील खुशाल मोकळ या भामट्याने धुळ्याहून स्वतःच्या नावे ३० हजार रुपये हवालाने जळगावला पाठवले. नंतर पैसे घेण्यासाठी दोघेही जळगाव, जोशी पेठ येथे धडकले. बराच वेळ टंगळमंगळ करून स्वतःचे ३० हजार घेतले. त्याच वेळेस प्रभा पॉलिमरचे जगताप आणि विभांडिक यांनी १५ लाखांची मोठी रक्कम काढल्याने त्यांचा पिच्छा पुरवत पैसे पळवल्याचे उघडकीस आले आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे