esakal | सकाळी धुळ्यातून निघाले आणि दुपारी जळगावात १५ लखाची केली लुट

बोलून बातमी शोधा

सकाळी धुळ्यातून निघाले आणि दुपारी जळगावात १५ लखाची केली लुट}

नशिक, जळगाव औरंगाबाद जळगाव पोलिसांना हवे असलेल्या भामट्यांवर मोहाडीरोड पोलिस ठाण्यात जबरीलूटचे गुन्हे दाखल आहे

सकाळी धुळ्यातून निघाले आणि दुपारी जळगावात १५ लखाची केली लुट
sakal_logo
By
रईस शेख

जळगाव : शहरातील पंचमुखी हनुमानमंदिरा जवळ दुपारी चार वाजता पिस्तुलच्या जोरावर १५ लाखांची लूट झाल्याची घटना घडली. दोन तासांतच अप्पर अधीक्षकांनी संशयीतांची ओळख पटवली. धुळ्यातील अट्टल गुन्हेगार खुशाल ऊर्फ मनोज मोकळं व त्याचा साथीदार ऋतीक रोहीत राजपुत ऊर्फ विक्की अशा दोघांच्या शोधार्थ जळगाव पेालिस धुळ्यात पेाचले होते. मात्र, देाघेही मिळून आले नाही.

आवश्य वाचा- ‘व्हर्टिकल गार्डन’साठीचा प्रोत्साहन निधी मिळाला; पण उदासीन मनपा तो खर्च करू नाही शकला 
 

धुळ्यातील एका राजकिय पक्षाच्या नगरसेवकाचे कार्यकर्ते आणि अट्टल लूटारु असलेल्या खुशाल ऊर्फ मनोज मोकळं व त्याचा साथीदार ऋतीक रोहीत राजपुत ऊर्फ विक्की अशा दोघांचे नावे जळगाव पेलिसांनी सिसीटीव्ही फुटेजच्या आधारावर निष्पन्न केली. अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी एकाच वेळेस जळगाव आणि धुळे गुन्हेशाखेच्या कर्मचाऱ्यांना सक्रिय केल्याने संशयीतांची कुंडली जळगाव पोलिसांना मिळाली, संध्याकाळी सव्वा चार वाजता घटना घडली. सहा वाजेपर्यंत दोघांची नावे निष्पन्न होवुन जळगाव पोलिस रात्री नऊ वाजता धुळ्यात दाखल झाले. संशयीतांचा शोध घेतला मात्र त्यांचा मागमुस रात्री उशिरा पर्यंत काही मिळून आलेला नाही.

धुळ्यातून सकाळी निघाले... 

सकाळी धुळ्यातून निघाले... संशयीत खुशाल ऊर्फ मनोज मोकळं व त्याचा साथीदार ऋतीक रोहीत राजपुत ऊर्फ विक्की अशा दोघांना साधारण बारा वाजेच्या सुमारास धुळेच्या अग्रसेन पुतळ्या जवळ बघीतले गेले. दोघेही जळगावच्या दिशेने काळ्यारंगाची पल्सर ने जात असल्याचे मोहाडी पेलिसांनी बघीतले नंतर काही तासांतच जळगाव शहरात पंधरा लाखांचा तडाखा देत दोघे पसार झाले आहे.

आवर्जून वाचा- जळगाव जिल्ह्याची महसूल वसुली ६२ टक्के; जळगावसह आठ तालुके ‘रेड झोन’मध्ये
 

नाशिक, जळगाव, औरंगाबाद येथे गुन्हे

नशिक, जळगाव औरंगाबाद जळगाव पोलिसांना हवे असलेल्या भामट्यांवर मोहाडीरोड पोलिस ठाण्यात जबरीलूटचे गुन्हे दाखल आहे, गेल्या महिन्यातच नाशिक पेलिसांनी त्यापैकी एकाला अटक केली होती. दोघांची मोडस ऑपरेंडी वेगवेळ्या जिल्ह्यात सारखीच असून स्थानिक गुन्हेगारांकडून मिळालेल्या टिपवर त्यांची लूट औलंबून असते, नाशिक नंतर जळगाव त्यानंतर औरंगाबाद असे एका मागुन एक ठिकाणी साथीदार बदलून गुन्हे करण्यात हे पारंगत असल्याची माहिती समोर आली आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे