दरोडा टाकणार तोच पोलिस दिसले; मग पळापळ आणि धरपकड  

प्रदिप वैद्य
Monday, 11 January 2021

नवीन विश्रामगृहाची मागे रावेर रोडवर सापळा रचला. मध्यरात्री या ठिकाणी सहाजण संशयित रित्या उभे असलेले दिसले. 

रावेर : येथे मध्यरात्री सहा जण शस्त्रासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना पोलीसांचा चाहुल लागताच चोरटे पळाल्याची घटना घडली. पोलिसांनी केलेल्या पाठलागेत सहापैकी दोन जणांना पकडण्यात यश आले. त्यांच्याजवळून लाल मिरचीची पूड, चाकू, तसेच घटनास्थळावरून कुऱ्हाड, दोन कटावणी व एक दोरी पोलिसांनी हस्तगत केली आहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

आवश्य वाचा-  गेलेले पैसे, दागीने परत मिळाले म्हणून आईच्या एका डोळ्यात आनंद; तर दुसऱ्या डोळ्यात मुलाचे दुःख !

याबाबतचे वृत्त असे की पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना मिळालेल्या माहितीनुसार आज मध्यरात्रीनंतर दीड वाजेच्या सुमारास सहा जण येथील नवीन विश्रामगृहाच्या मागील बाजूस अजंदा रोडवर उभे असल्याची माहिती मिळाली यावरून श्री वाकोडे यांनी पथक नेमून सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक मनोहर जाधव ,पोलीस नाईक महेंद्र सुरवाडे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील वंजारी ,प्रमोद पाटील, सुरेश मेढे, कुणाल सोनवणे, सुकेश तडवी, विशाल पाटील, मंदार पाटील यांचे पथक तयार केले. 

असा रचला सापळा रचला 

मिळालेल्या गुप्त माहितीवरून नवीन विश्रामगृहाची मागे रावेर रोडवर सापळा रचला. मध्यरात्री या ठिकाणी सहाजण संशयित रित्या उभे असलेले दिसले. पोलिस कारवाई करणार तोच पोलिस असल्याचा सुगावा चोरट्यांना लागताच त्यांनी पळ काढला.

आवर्जून वाचा- तहान भागविण्यासाठी खाली उतरला अन्‌ जीवनच संपले; धावत्‍या रेल्‍वेत चढणे पडले महागात
 

दोन जणांना पकडण्यात यश 

पोलिसांचा सुगावा लागताच चोरटे पळत असतांना पोलिसांनी केलेल्या पाठलागेत शेख हसन शेख अन्वर (वय 24) राहणार फतेह नगर रावेर, याच्याजवळून लाल मिरचीची पूड व गोलू  अब्दुल अकील अब्दुल शकील (वय 25) राहणार हुसेनी मशिदी जवळ रावेर याच्याजवळ छोटा चाकू आढळून आला. तर घटनास्थळावर कुऱ्हाड, दोन कटावणी, एक सुती पांढरी दोरी असे आढळून आले. सदर संशयित दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी या दोन जणांना साहित्यासह ताब्यात घेतले.

हेही वाचा- ग्रामपंचायत निवडणूका रंगात; चौकाचौकांमध्ये लागलेले पोस्टर्सने वातावरण तापले 
 

अन्य संशयातीच्या शोधात पथक रवाना
पळून गेलेल्या चारही संशयितांना अटक करण्यासाठी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी पथक तयार केले असून लवकरच त्याला अटक होईल व इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे .पोलिसांनी वेळीच दोन जणांना अटक केल्यामुळे चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न उधळून लावला आहे . यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime marathi news raver robbers arrested escaped police trap