सात महिन्याच्या संसाराची साथ सोडून विवाहीता दागीने, पैसे घेवून फरार 

विनोद सुरवाडे
Tuesday, 12 January 2021

विवाहाला सात महिने झाला असता घरात कोणी नसल्याचा फायदा घेत घरातील दागदागीने रोकड घेवून पत्नी फरार झाली.

वरणगाव : येथील एका तरुणाचा सात महिन्यापूर्वी विवाह झाला. आणि सात महिन्याचा संसार सुरू असतांना अचानक पत्नी घरातील पैसे, दागिने व मोबाईल घेवून फरार झाल्याची घटना घडली. याबाबत वरणगाव पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
 

आवश्य वाचा- कोविडच्या ‘आरटीपीसीआर’चाचण्या वाढवा; अन्यथा होणार कारवाई ! 
 

वरणगाव (ता. भुसावळ) येथील सिध्देश्वरनगरातील रहिवाशी प्रकाश (नाव बदलेले) हा तरूण आई, भाऊ, वहीणी यांच्यासोबत राहत होता. प्रकाशचे लग्न पोस्टपालवणी तालुका मंडणगड, रत्नागिरी येथील तरुणीशी जून महिन्यात विवाह झाला होता.  

सात महिन्याचा संसार

प्रकाश (नाव बदलेले) यांचा विवाहाला सात महिने झाला असता राणी (बदलेले नाव) ही घरात कोणी नसल्याचा फायदा घेत घरातील दागदागीने रोकड 60 हजार रुपये व 12 हजार रुपये किमतीचा मोबाईल घेवून निघून गेली.

वाचा- पोलिसांना सांगतो का, आता घे म्हणत चेहऱ्यावर 'सपासप' केले वार

 

पतीची शोधाशध

पत्नी घरातून कोणालाच न सांगता निघून गेल्याने पतीने गावात तसेच नातेवाईकाकडे शोध घेतला. परंतू पत्नी सापडून न आल्याने वरणगाव पोलिस्टेशनला पतीच्या यांच्या खबरीवरून हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime marathi news varngaon wife jewelery mony fled run police husband search