Jalgaon Crime : बीएलओ डोळे यांच्यावर फौजदारी कारवाई सुरू : जितेंद्र पाटील

Jalgaon Crime : बीएलओ डोळे यांच्यावर फौजदारी कारवाई सुरू : जितेंद्र पाटील
esakal

Jalgaon Crime : निवडणूक आयोगाच्या सर्वच नियमांची पायमल्ली केल्याचा ठपका ठेवत उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी बी. एल. ओ. अजय डोळे यांच्यावर फौजदारी कारवाई सुरू केली आहे.

आगामी निवडणुका बघता मतदान याद्यांचे काम पूर्ण करण्यासाठी पंचायत समितीत झालेल्या आढावा बैठकीस गैरहजर असलेले ४० व उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या २० बी. एल. ओ. यांना आरपीआय अधिनियम १९५०चे कलम ३४ अन्वये नोटीस देण्यात आल्या होत्या. (Criminal action initiated against BLO dole jalgaon crime news)

त्यापैकी श्री. डोळे यांनी सर्वच नियमांची पायमल्ली केल्याचे उघड झाल्याने त्यांच्या विरूद्ध फौजदारी कारवाई सुरू केली आहे.

पंचायत समितीत झालेल्या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर, उपविभागीय अधिकारी श्री. पाटील, तहसीलदार लीना लबडे, नायब तहसीलदार अंगद अंसटकर यांच्यासह तालुक्यातील बी. एल. ओ. उपस्थित होते. गैरहजर असलेल्या ४० बीएलओंना नोटीस बजावून भविष्यात फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon Crime : बीएलओ डोळे यांच्यावर फौजदारी कारवाई सुरू : जितेंद्र पाटील
Jalgaon Crime : तक्रार घेऊन आला अन्‌ व्हीडीओ व्हायरल केला; तरूणास चोप

बैठकीतील सूचना

सदर आढावा बैठकीत दिव्यांग मतदार नावांमध्ये दुरुस्ती वा बदल, मयतांची नावे कमी करणे, अस्पष्ट असलेले फोटो अपडेट करणे, ८० वर्षापेक्षा जास्त वयाचे मतदार असल्यास त्यांच्या घरी जाऊन खात्री करून घेणे, घर टू घर मतदारांची नोंदणी करणे, वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्यांची मतदार यादीत नोंदणी करणे आदी सूचना देण्यात आल्या आहेत.

या सर्व सूचनांचे पालन न करणे, सतत गैरहजर राहणे, नोटिसचे उत्तर न देणे, अरेरावीची भाषा करणे असा ठपका ठेवत डोळे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली.

Jalgaon Crime : बीएलओ डोळे यांच्यावर फौजदारी कारवाई सुरू : जितेंद्र पाटील
Jalgaon Crime News : भांडणातून घर जाळणाऱ्या एकाला 6 वर्षांची शिक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com