Jalgaon Crime News: जामिनावर सुटताच गुन्हेगाराचा पुन्हा उपद्रव; घातक शस्त्रास्त्राचे 7 गुन्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon Crime News: जामिनावर सुटताच गुन्हेगाराचा पुन्हा उपद्रव; घातक शस्त्रास्त्राचे 7 गुन्हे

जळगाव : भुसावळ शहरातील भिलवाडी यावल नाका येथे वास्तव्यास असलेला अट्टल गुन्हेगार मुकेश प्रकाश भालेराव (वय २८) याला जिल्‍हा न्यायदंडाधिकारी अमन मित्तल यांच्या आदेशाने १ वर्षासाठी स्थानबद्धता करण्यात आले. (criminal trying to commit new crime after bail was remand for one year jalgaon crime news)

त्याला अटक करून नाशिक कारागृहात रवाना केले आहे. भुसावळ जंक्शन येथील अट्टल गुन्हेगारांवर पोलिस दलाची वक्रदृष्टी पडली असून, सर्व संशयितांच्या कुंडल्या तपासण्याचे काम सुरू आहे.

भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघन यांच्यातर्फे प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव सादर केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किशन नजन पाटील यांच्या तांत्रिक टीमने मुकेश प्रकाश भालेराव याला ताब्यात घेतले. संशयित मुकेश भालेराव याची वैद्यकीय तपासणी करून नाशिक कारागृहात रवाना करण्यात आले.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Jalgaon News : आदिवासी कोळी जमातीचे जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू

मुकेश भालेराव याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न ४, दंगा भडकवणे १, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे १, आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह एकूण ७ गंभीर गुन्हे दाखल असून, त्याच्यावर स्थानिक पोलिस ठाण्यांतर्फे वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाईही झाली आहे.

मात्र, जामिनावर सुटताच नवा गुन्हा घडवून आणण्याचा त्याचा प्रयत्न असल्याने, तसेच तो सभ्य समाजात राहण्यालायक नसल्याने त्याच्याविरुद्ध एक वर्ष स्थानबद्ध करण्याची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: Jalgaon Crime News : गुन्हेगारांचे धाबे दणाणले; जळगावच्या गॅंगवर मोक्कांतर्गत कारवाई