Jalgaon : मौलवीला धमकावणारा‌ खुनाच्या गुन्ह्यात अडकला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Crime News

Jalgaon : मौलवीला धमकावणारा‌ खुनाच्या गुन्ह्यात अडकला

जळगाव : सालारनगरातील मशिदीच्या मौलवीला धमकावल्याची (Threaten) तक्रार देण्यासाठी मौलवी रविवारी (ता. १) एमआयडीसी पोलिसांत आले होते. मात्र, ज्याची तक्रार करायची तोच पोलिस ठाण्यात दिसल्याने मौलवी तेथून निघून गेले. संबंधित संशयित सहा वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातील खुनाच्या गुन्ह्याचा (Murder case) संशयित आरोपी असून त्याला घेण्यासाठी आलेले मध्यप्रदेश पोलिस अचानक एमआयडीसी (MIDC) पोलिसांत पोचले अन्‌ संशयिताची ओळख पटवून सोबत घेउन गेल्याचा गजब किस्सा सोमवारी (ता. २) पोलिस ठाण्यात घडला. दोन संशयित अद्याप फरार आहेत. (criminal who Threaten Maulvi caught in murder case Jalgaon Crime News)

हेही वाचा: धार्मिकनगरीतील ‘भोंगा’यण; ‘भोंगा लावण्याबद्दल मी काय बोलावे?’ : राज्यपाल

सालारनगरातील एका मशिदीचे मौलवी रविवारी रात्री अकरा वाजता एकाने धमकावल्याची तक्रार देण्यासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आले होते. मात्र, तो व्यक्तीच (निजाम खान मुल्तानी) याला पोलिस ठाण्यात पाहून मौलवी उगाच वाद नको म्हणून निघून गेले. पोलिसांनी निजाम खान मुल्तानी यास सकाळी येण्याचे सांगितले, तेवढ्यात मध्यप्रदेश पोलिसांचे तपासपथक त्याठिकाणी धडकले. त्यांनी निजाम खान मुल्तानीची ओळख पटवून त्यास अटक करून नेले.

हेही वाचा: Jalgaon : गर्दीचा फायदा घेत लूट; गुन्हा दाखल

Web Title: Criminal Who Threaten Maulvi Caught In Murder Case Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top