
जळगाव : कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी, तसेच जनसामान्यांना मालमत्ता आणि सुरक्षेची हमी मिळावी, यासाठी पोलिस प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून समाजात राहण्यालायक नसलेल्या गुन्हेगारांना तडीपार केले जाते.
मात्र, तडीपारीचे आदेश झुगारून गुन्हेगारांचा मुक्त संचार वाढल्याचे वारंवार दिसून येत आहे. तडीपार केलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे. (Criminals defying orders of Tadipar Arrested by police Jalgaon News)
हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
नीलेश नरेश हंसकर (वय २०, रा. गुरुनानकनगर) याला जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशान्वये ११ ऑक्टोबरला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. त्याचप्रमाणे कांचननगरात पोलिस पथक धडकल्यावर तेथे विक्रम राजू सारवान (वय ३२, रा. गुरुनानकनगर) आढळून आला.
सारवान यालाही ११ ऑक्टोबर २०२२ पासून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तडीपार गुन्हेगार मोकाट फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरून शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या गुन्हे शोध पथकातील परीश जाधव, राहुल पाटील, अनिल कांबळे, मुकुंद गंगावणे, विक्की इंगळे यांनी वरील दोघांना अटक करून पोलिस ठाण्यात आले. दोन्ही गुन्हेगारांवर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.
हद्दपारीचा प्रभाव संपला?
पोलिस व जिल्हा प्रशासनातर्फे अट्टल गुन्हेगारांना तडीपार करण्यात येते. मात्र, तडीपारीचे आदेश झुगारून अट्टल गुन्हेगार सर्रास मोकाट हिंडत असल्याचे वारंवार आढळून येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.