
जळगाव : जिल्हा पोलिस दलाच्या जलतण तलावाच्या खेळाडूंनी चमकदार कामगीरी करत जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. या स्पर्धकांची राज्यस्तरीय मॉर्डन पेंटाथलॉन स्पर्धा व मीनी ऑलम्पिक पात्रता स्पर्धेत निवड झाली.
पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात रविवारी (ता. १८) झालेल्या पात्रता चाचणीत धावणे, शूटिंग आणि जलतरण प्रकारात पोलिस जलतरण तलावातील आठ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या सर्व खेळाडूंची चौथी राज्यस्तरीय मॉडर्न पेंटाथलॉन स्पर्धा व मीनी ऑलम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. (Police swimmers compete Selection for Pentathlon Meaning Olympics Jalgaon Sports News)
हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
स्पर्धेचा निकाल असा
१९ वर्षांखालील मुले-मुली : तलाह सिद्दिकी (चौथा), धनश्री जाधव आणि अमेय नगरकर (पाचव्या स्थानी), हर्षवर्धन महाजन (आठव्या स्थानी), आयान शेख (नवव्या स्थानी), १७ वर्षांखालील मुले-मुली : ओम चौधरी (तृतीय स्थानी), लाजरी खाचणे (चौथ्या स्थानी), जानवी महाजन (पाचव्या स्थानी).
सहभागी सर्व जलतरणपटूंची पुढील महिन्यात बालेवाडी क्रीडा संकुलात होणाऱ्या मॉडर्न पेंटाथलॉन ऑलम्पिक स्पर्धेत निवड झाली आहे, तसेच मीनी ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या जळगाव जिल्ह्याच्या संघास प्रशिक्षक म्हणून जयंत चौधरी, सूरज दायमा, टेक्निकल ऑफिशियल म्हणून कमलेश नगरकर यांची नियुक्ती झाली आहे.
पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक संदीप गावित, निरीक्षक अंबादास मोरे, सहाय्यक निरीक्षक सुनंदा पाटील आदींनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.