Maha Shivpuran Katha : शिवमहापुराण कथेस्थळी 3 दिवस अधीच भाविकांची गर्दी; आयोजकांची तयारी वेगात

Accommodation of Pandit Mishra will be arranged in this house.
Some people have already started securing seats for Pandit Pradeep Mishra's Shiv Mahapuran story to be held on Tuesday. A couple and a child from Shegaon.
Accommodation of Pandit Mishra will be arranged in this house. Some people have already started securing seats for Pandit Pradeep Mishra's Shiv Mahapuran story to be held on Tuesday. A couple and a child from Shegaon.
Updated on

Maha Shivpuran Katha : येथील वडनगरी फाट्याजवळील बडे जटाधारी मंदिर संस्थानतर्फे पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा मंगळवार (ता. ५) पासून आयोजित करण्यात आली आहे.

तीन दिवस अगोदरच भाविकांनी मंडपात आपली जागा सांभाळली आहे. नागपूर, बुऱ्हाणपूर, चाळीसगाव आदी ठिकाणांहून कुटुंबासह भाविक आले आहेत. त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी झाली.(Crowd of devotees for more than 3 days at Shiv Mahapuran katha place in jalgaon news )

शहरातील कानळदकडे जाणाऱ्या बडे जटाधारी मंदिराजवळ शिवमहापुराण कथा १५ तारखेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक येण्याची शक्यता लक्षात घेऊन जोरदार तयारी सुरू आहे. तब्बल ३०० एकर जागा घेण्यात आली आहे.

यातील १२० एकर जागेवर भव्य मंडप उभारणीचे काम सुरू आहे. तर २०० एकर जागेवर वाहनतळ असणार आहे. याठिकाणी दुचाकी, चारचाकी, तसेच बस पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे.

प्रवचनासाठी भव्य व्यासपीठ

पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथा प्रवचनासाठी येथील कारागीरांकडून भव्य व्यासपीठ उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. या ठिकाणी हिमालय पर्वताचा देखावा असणार आहे.

एक हजार स्वयंसेवक

कार्यक्रमस्थळी नागरिकांची सुविधेसाठी एक हजार स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वयंसेवक आतापासूनच आपली सेवा देत आहेत. यात महिला मोठ्या संख्येने आहेत. यात केवळ २५ ते ४५ वयोगटांतील सेवाधारी आहेत. मंडप उभारणीसह इतर कामांसाठी ४०० ते ५०० कर्मचारी कार्यरत आहेत.

Accommodation of Pandit Mishra will be arranged in this house.
Some people have already started securing seats for Pandit Pradeep Mishra's Shiv Mahapuran story to be held on Tuesday. A couple and a child from Shegaon.
Maha Shiv Puran Katha: मुलांवर अपेक्षांचा दबाव टाकू नका : पंडित प्रदीप मिश्रा

भोजनासाठी साहित्याची देणगी

भाविकासांठी या ठिकाणी भोजनांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात देणगीदारांकडून गहू, तांदूळ, दाळ, तेल, तिखट, तूप असे दाण करण्यात येत आहे. देणगीदारांचीही गर्दी असून, भाविकांनी अधिक सहकार्य करावे, असे अवाहन करण्यात आले आहे.

भाविकांची आतापासूनच गर्दी

शिवमहापुराण कथा मंगळवारपासून सुरू होत आहे. परंतु भाविकांची आतापासूनच सभामंडपात बसण्यासाठी गर्दी सुरू झाली आहे. बाहेरगावाहून आलेल्या भाविकांनी आपली जागा सांभाळली आहे.

ते मुक्कमही करीत आहेत. नागपूर, बुऱ्हाणपूर, चाळीसगाव, तसेच इतर गावांहून भाविक कुटुंबासह आलेले आहेत. भाविक जागा सांभाळण्याची घाई करीत असल्याने कर्मचाऱ्यांना काम करणेही कठीण झाले आहे.

बसची सुविधा

शिवमहापुराण कथेसाठी बसचीही सुविधा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील भाविक येण्याची शक्यता असल्यामुळे एस.टी. महामंडळातर्फेही खास बसची सुविधा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध बसस्थानकांतून बस सोडण्यात येणार आहेत. बस वाहनतळाची सुविधाही करण्यात आली आहे.

Accommodation of Pandit Mishra will be arranged in this house.
Some people have already started securing seats for Pandit Pradeep Mishra's Shiv Mahapuran story to be held on Tuesday. A couple and a child from Shegaon.
Maha Shiv Puran Katha: शिवपुराण कथेच्या जागेवरील 21 टन कचरा संकलित

पंडित मिश्रांच्या निवासाची व्यवस्था

पंडित प्रदीप मिश्रांची निवासव्यवस्थाही प्रवचन कथास्थळी करण्यात आली आहे. या ठिकाणी ‘शिव-कृपा’ नवीन निवासस्थान बांधण्यात आले असून, रंगरंगोटीही करण्यात आली आहे.

बडे जटाधारी मंदिरात गर्दी

शिवमहापुराण कथेच्या निमित्ताने वडनगरी फाट्यावरील बडे जटाधारी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तसेच दर्शनासाठी येणारे भाविक गहू, डाळ, तेल देणगीही देत आहेत.

दिव्यांग मुलासाठी आले दांपत्य

शेगाव येथील एक दांपत्य आपल्या सात वर्षांच्या मुलाला घेऊन आले आहे. त्यांचा मुलगा दिव्यांग आहे. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथा प्रवचनामुळे तो बरा होईल, अशी त्यांनी अपेक्षा आहे. गेल्या दोन दिवसांपासूनच ते कथास्थळावर मुक्कमी आहेत.

Accommodation of Pandit Mishra will be arranged in this house.
Some people have already started securing seats for Pandit Pradeep Mishra's Shiv Mahapuran story to be held on Tuesday. A couple and a child from Shegaon.
Maha Shivpuran Katha: श्री शिवमहापुराण कथेसाठी एसटीचा स्वतंत्र नियंत्रण कक्ष; दररोज 200 जादा बसगाड्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com