श्रावण सोमवार निमित्ताने महादेव मंदिरात भाविकांची गर्दी

Kajgaon (T. Bhadgaon) : Jagurt Devasthan Mahadev Mandir.
Kajgaon (T. Bhadgaon) : Jagurt Devasthan Mahadev Mandir.esakal

कजगाव (जि. जळगाव) : येथील मनमाड कंपनी भाग व जुन्या हायस्कूलजवळील पुरातन महादेव मंदिरात सध्या श्रावणानिमित्त भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे.

मंदिरात सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी व शिवअभिषेकासाठी गर्दी दिसून येते. हे मंदिर श्रावण सोमवारसह संपूर्ण महिनाभर गजबजलेले असते. (Crowd of devotees in Mahadev temple on occasion of Shravan at kajgaon on Monday jalgaon Latest Marathi News)

Kajgaon (T. Bhadgaon) : Jagurt Devasthan Mahadev Mandir.
जिद्द : मंडप व्यवसायातून कुटुंबासाठी उभ्या राहिल्या सुरेखाताई

कजगावसह परिसरातील अनेक भाविक मोठ्या आनंदाने येतात. या मंदिराचा इतिहास पहिला तर येथे कधीकाळी साधारण ४० ते ५० वर्षांपूर्वी लग्नसराईत दिवसाला अनेक विवाह व्हायचे. मात्र काळानुरूप येथील विवाह कमी होत गेले.

मात्र आजही येथे अनेक भाविक मोठ्या प्रमाणात येतात. श्रावण महिन्यात अनेक भाविक दर्शनासाठी येतात. मंदिराच्या परिसरात पुरातन पिंपळाचे व वडाचे झाड असून, या झाडांमुळे मंदिर परिसरात कुठल्या ऋतूत अत्यंत थंड, हवेशीर वातावरण अनुभवायला मिळते. तसेच दरवर्षी शेवटच्या श्रावण सोमवारी ग्रामस्थांच्या वतीने येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.

Kajgaon (T. Bhadgaon) : Jagurt Devasthan Mahadev Mandir.
Zarif Baba Murder Case : SITकडून चौकशी; 5वा संशयित अद्यापही फरार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com