Cylinder explosion
Cylinder explosionesakal

ऊसतोड मजुराच्या घरात सिलिंडरचा स्फोट; 3 लाखांचे नुकसान

Published on

चाळीसगाव (जि. जळगाव) : सांगवी (ता. चाळीसगाव) येथील ऊस तोडणी करून कुटुंबीयांची गुजराण करणाऱ्या मजुराच्या घरात बुधवारी (ता. ११) सकाळी दहाच्या सुमारास गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट होऊन लागलेल्या आगीत रोकडसह सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल खाक झाला. या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली.

सांगवी (ता. चाळीसगाव) येथील दामू फंदू राठोड मजूर कुटुंबीयांसह ऊस तोडणी करून तांड्यावर घरी नुकतेच परतले आहेत. ऊस तोडणच्या मजुरीचे पैसे त्यांच्याजवळ घरात होते. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे त्यांच्या पत्नी गॅसवर स्वयंपाक करीत असताना, अचान सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. स्फोट होताच राठोड यांच्या पत्नी घराबाहेर पळत आल्या. काही समजण्याच्या आतच घरातील वस्तूंनी पेट घेतला. यात संसारोपयोगी साहित्यांसह पाच ग्रॅमचे सोने, बाजरी, बैलांची विक्री करून व ऊस तोडणीच्या मजुरीचे मिळालेले एक लाख रुपये, असा सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल खाक झाला. स्फोटामुळे दामू राठोड यांच्या घराशेजारी राहणाऱ्या धनंजय ठाकरे यांच्याही घराला हादरा बसल्याने त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. दामू राठोड यांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांना शासनाने तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही.

Cylinder explosion
राज ठाकरेंना चॅलेंज देणाऱ्या भाजप नेत्याला एकदा अटलजींनी तुरुंगात पत्र लिहिलेलं
Cylinder explosion
नवनीत राणांच्या लिलावती रुग्णालयातील फोटो प्रकरणी गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com