Jalgaon News : नवरीच्या विदाईपूर्वीच लग्नमंडपात दुःखाची त्सुनामी; मंडपाजवळच आढळला मृतदेह

Work in progress of builder's duplex bungalow near Mandapam.
The girl drowned in the same septic tank.
Work in progress of builder's duplex bungalow near Mandapam. The girl drowned in the same septic tank.esakal

Jalgaon News : शहरातील शिवाजीनगर येथील उस्मानिया पार्कमध्ये लग्नासाठी आलेल्या बालिकेचा मंडपाजवळील बांधकामाच्या ठिकाणी अंडरग्राउंड सेप्टी टँकमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

लग्न मंडपात पंगत संपवून नवरीची विदाई होण्यापूर्वीच ही घटना घडल्याने एकच आक्रोश आणि किंचाळ्यांनी मंडपासह लग्नघर हादरले.(dead body was found near pavilion in jalgaon news )

बंदोबस्तात व्यस्त असलेल्या शहर पोलिसांना दुपारी घडलेल्या या घटनेची माहिती रात्री उशिरापर्यंत नसल्याचे आढळून आले. मृत बालिकेला घेऊन कुटुंबीय साक्री (ता. धुळे) येथे रवाना झाले असून, या प्रकरणी शहर पोलिसांत कुठलीच नोंद नव्हती.

शहरातील उस्मानिया पार्क परिसरात शनिवारी (ता. ९) राज्य परिवहन मंडळाचे निवृत्त कर्मचारी मुक्तार सय्यद यांच्या घरी मुलीचे लग्न असल्याने त्यांचे जळगाव, धुळे, नंदुरबारसह इतर ठिकाणचे नातेवाईक लग्नासाठी आले होते. निजामपूर (ता. साक्री) येथील परवेझ सय्यद यांची पत्नी तीन मुलांसह शुक्रवारपासून जळगावला आल्या होत्या.

उस्मानिया पार्क परिसरातील गट नं. (४१७/३-अ) मध्ये खासगी बिल्डर्सकडून ड्युप्लेक्स स्किम अंतर्गत मागूनपुढून आठ घरांचे बांधकाम सुरू आहे. लग्न मंडपाला लागूनच बांधकाम सुरू असल्याने लग्नासाठी आलेल्या लहान मुलांसह गल्लीतील मुलेही येथे खेळत होती. खेळता-खेळता तस्मिरा परवेझ सय्यद या बालिकेचा पाण्याने भरलेल्या १० ते १२ फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून मृत्यू झाला.

लग्नाचा गल्लीतच मंडप टाकण्यात आला होता. मंडपाजवळच चार ड्युप्लेक्स बंगलोचे बांधकाम सुरू असून प्रत्येक घरात स्वतंत्र सेप्टिक टँक बांधले आले. बांधकामासाठी लागणारे पाणी याच या टाक्यांमधून घेतले जात असल्याने त्या पाण्याने भरलेल्या होत्या. सर्वच लहान मुले बांधकामाच्य ठिकाणी, वाळूवर खेळत असल्याचे सय्यद यांच्या लक्षात आले.

Work in progress of builder's duplex bungalow near Mandapam.
The girl drowned in the same septic tank.
Jalgaon Crime News : ग्रामपंचायत सदस्यास शिवीगाळ; 6 जणांवर ॲट्रॉसिटी दाखल

स्लॅबचे काम सुरू असल्याने त्यांनी लहानग्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी गेले असता त्यांना भरलेला सेप्टीटँक दिसला. त्यांनी एकेक करून चारही घरातील टँक पाट्यांनी झाकण्यास सुरवात केली. चौथ्या टँकमध्ये मुलीचा फ्रॉक दिसल्याने कुणाची बाहुली टाकीत पडली म्हणून डोकावले असता त्यात मृत बालिका आढळली.

पाण्याच्या टाकीत बालिका पडल्याचे कळताच लग्नमंडपात महिलांनी एकच आक्रोश केला. तरुणांनी उडी मारून बालिकेला बाहेर काढले. तत्काळ रुग्णालयात नेले डॉक्टरांनी तपासून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी बालिकेला मृत घोषित केले.

आई पडली बेशुद्ध

बालिकेचे वडील परवेझ सय्यद साक्री तालुक्यात रिक्षा चालवून गुजराण करतात. जवळचे लग्न असल्याने पत्नी तिन्ही चिमुरड्यांसह कुटुंबातील इतर लोक जळगावला आले होते. मात्र, ते आले नव्हते. तस्मिराचा मृत्यू झाल्याचे कळताच मुलीची आई बेशुद्ध पडली. आईच्या अक्रोशने मंडपात आणि संपूर्ण गल्लीत महिलांना हुंदके अनावर झाले होते.

बांधकाम बेकायदेशीर

सातवर्षीय बालिकेचा बुडून मृत्यू झालेले बांधकाम बेकायदेशीर असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. पाण्याच्या टाकीसाठी खुला भूखंड म्हणून ही जागा आरक्षित केल्याचे काही जणांनी सांगितले, तर जवळच एक डकी विहीर असून ती बुजून गाळरस्ताही गडप करण्याचा घाट कथित बिल्डरमार्फत सुरू असल्याचे सांगण्यात आले. संबंधित बिल्डरशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Work in progress of builder's duplex bungalow near Mandapam.
The girl drowned in the same septic tank.
Jalgaon Accident News : ट्रकच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू; संतप्त नागरिकांचा महामार्गावर रास्ता रोको

पोलिस दल अनभिज्ञ

वडनगरी फाटा येथे पंडित प्रदीप मिश्रा यांचे शिवमहापुराण कथा सुरू असल्याने त्याच्या बंदोबस्तात अख्खे पोलि सदल व्यस्त आहे. उस्मानिया पार्क भागात गंभीर घटना घडलेली असतानाही रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसांना याबाबत काहीच माहिती नव्हती.

तर, पोलिसांत कुठलीही नोंद न करता नातेवाईक बालिकेचा मृतदेह घेऊन परस्पर साक्रीला निघून गेल्याचे सांगण्यात आले. बिल्डरच्या निष्काळजीमुळे बालिकेचा मृत्यू झाला असून, संबंधितावर कठोर कारवाईची मागणी रहिवाशांनी केली.

Work in progress of builder's duplex bungalow near Mandapam.
The girl drowned in the same septic tank.
Jalgaon News : पाचोरा-भडगाव मतदारसंघासाठी 43 कोटींचा निधी : आमदार किशोर पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com