
5 बहिणींच्या एकुलत्या एक भावावर काळाचा घाला; कुटुंबाला आक्रोश अनावर
जळगाव : गेल्या सहा वर्षांपासून छापखान्यात कामाला असलेल्या कुबेर जितेंद्र राजपूत (वय २२) या तरुणाचा कामावर असताना, चक्कर येऊन मृत्यू झाला. मृताच्या डोळ्याखाली व्रण उमटले असून, नेमका मृत्यू कशाने झाला, याचे कारण शवविच्छेदन अहवालातून समोर येणार आहे. प्रेस मालकाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे.
तरसोद (ता. जळगाव) येथील कुबेर राजपूत सहा वर्षांपासून जळगावच्या शिवतेज प्रिंटींग प्रेसमध्ये कामावर होता. नेहमीप्रमाणे तो कामावर वेळेवर आला. सायंकाळी पाच ते सव्वापाचच्या सुमारास मालकाने कुबेरचे पाहुणे दीपक यांना भ्रमणध्वनीवरून कुबेर चक्कर येऊन खाली पडल्याची माहिती मिळाली. त्याला बेशुद्ध अवस्थेत खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा: जळगाव : शेतीपंपासह केबल चोरणारी टोळी अटकेत
डोळ्याजवळ व्रण
माहिती मिळताच राजपूत कुटुंबाने जळगावला धाव घेतली. जिल्हा रुग्णालयात कुबेरचा मृतदेह बघितल्यावर त्यांना त्याच्या दोन्ही डोळ्यात व्रण आढळून आले. परिणामी, मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची विचारणा त्यांच्या कुटुंबाकडून होत असून, संपूर्ण माहिती मिळावी, अशी मागणी त्याच्या कुटुंबाने केली आहे. दरम्यान, जितेंद्र राजपूत यांना पाच मुली व मुलगा (कुबेर) असून, पाच बहिणींचा एकुलता लाडका भाऊ काळाने हिरावून घेतल्याने कुटुंबाला आक्रोश अनावर झाला होता.
हेही वाचा: जळगाव महापालिकेत कामात कसूर करणाऱ्या 41 कर्मचाऱ्यांना नोटीस
Web Title: Death Of A Young Worker In Printing Press Jalgaon News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..