Jalgaon Crime News : गोळीबारात जखमी झालेल्या माजी नगसेवकाचा मृत्यू

शनिवारी (ता. १०) सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस बंदोबस्तात निघालेल्या अंत्ययात्रेत मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
Mahendra More
Mahendra Moreesakal

Jalgaon Crime News : तीन दिवसांपूर्वी गोळीबारात जखमी झालेले येथील भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळासाहेब मोरे यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरु असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

शनिवारी (ता. १०) सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस बंदोबस्तात निघालेल्या अंत्ययात्रेत मोठा जनसमुदाय उपस्थित होता. (Death of ex nagarsevak injured in firing jalgaon crime news)

शहरातील रेल्वे स्थानकाजवळील हनुमानवाडी परिसरात बाळासाहेब मोरे यांचे संपर्क कार्यालय आहे. श्री. मोरे बुधवारी (ता. ७) नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयात बसलेले असताना सायंकाळी पाचच्या सुमारास चारचाकी वाहनातून आलेल्या पाच जणांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला होता.

ज्यात ते गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना शहरातील डॉ. देवरे यांच्या दवाखान्यात दाखल केल्यानंतर तेथून नाशिक येथे उपचारार्थ हलविण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु असतांना पहाटे तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

आज सायंकाळी सहाला त्यांची अंत्ययात्रा निघाली. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Mahendra More
Akola Crime: बसमधून रोख रक्कमेसह १३.३३ लाखांचे दागिने लंपास! ३ तरुणांनी अशी केली चोरी

आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह विविध राजकीय, शैक्षणिक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मयत बाळासाहेब मोरे यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने अंत्ययात्रेला प्रचंड गर्दी झाली होती.

दरम्यान, गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांना गोळीबार करणाऱ्यांनी वापरलेली कार नागद रस्त्यावर मिळून आली होती.

गोळीबार करणारे पळून जाण्यात यशस्वी झाले असले तरी त्यांचा कसून शोध घेतला जात असल्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी सात जणांवर आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mahendra More
Nagpur Crime: नागपुर हादरले! चोवीस तासांत तीन खून, उधारीच्या पैशाच्या वाद आणि क्षुल्लक भांडणातून युवकांचा खून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com