Jalgaon News : बांभोरीत आंदोलनातील कामगाराचा मृत्यू | Death of protest worker in Bambori jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon News : बांभोरीत आंदोलनातील कामगाराचा मृत्यू

Jalgaon News : बांभोरीत आंदोलनातील कामगाराचा मृत्यू

Jalgaon News : बांभोरी (ता. जळगाव) येथील एका खासगी कंपनीसमोर सुरू असलेल्या आंदोलनातील कामगाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.

दरम्यान, प्रशासनाच्या दबावामुळे व मानसिक त्रासामुळेच कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करत कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. (Death of protest worker in Bambori jalgaon news)

शेखर गोकुळ पाटील (वय ५० रा. खेडी कढोली ता.एरंडोल) असे मृत कामगाराचे नाव आहे.

बांभोरी येथील हिताची कंपनीत कार्यरत शेखर पाटील गेल्या २० ते २५ वर्षांपासून कंपनीत कंत्राटी पद्धतीने नोकरीला होते. २३ मेपासून त्यांच्यासह इतर कामगारांनी कंपनीसमोर प्रलंबित व विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन पुकारले आहे.

रविवारी (ता.४) आंदोलनाचा तेरावा दिवस होता. या आंदोलनात शेखर पाटील सुद्धा सहभागी होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र सायंकाळी सातच्या सुमारास अस्ताव्यस्त वाटत असल्याने ते घराकडे निघून आले. घरी असताना गोकुळ पाटील यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

न्यायासाठी रुग्णालयात आंदोलन

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह दाखल करण्यात आला आहे. जोपर्यंत कामगारांना आणि मृताच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला आहे.

यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईक व कंपनीच्या कामगारांची मोठी गर्दी होती. मृताच्या कुटुंबीयांची समजूत घालण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे सुरु होता.

टॅग्स :Jalgaoncrimeworkers