Road Construction : पिंप्राळा मुख्यरस्त्याचे काम 12 मीटर करा; सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना

Mayor Jayashree Mahajan inspecting the road work from Chhatrapati Maharaj Chowk to Pimprala Railway Gate.
Mayor Jayashree Mahajan inspecting the road work from Chhatrapati Maharaj Chowk to Pimprala Railway Gate.esakal

Road Construction : छत्रपती महाराज चौक ते पिंप्राळा रेल्वेगेट या रस्त्याच्या कामाला सुरवात झाली आहे.

पिंप्राळा येथील मुख्य रस्त्याचे ४२ कोटी च्या निधीतून सुरू असलेले काम आठ मीटर आहे त्या ऐवजी ते काम बारा मीटरचे करण्यात यावे अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी दिल्या आहेत. (mayor Intimation to pwd to make 12 meters of Pimprala main road jalgaon news)

छत्रपती महाराज चौक ते पिंप्राळा रेल्वेगेट रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यात आली. या प्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील, नगरसेविका नीता सोनवणे, प्रतिभा देशमुख व परिसरातील नागरिकांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, महानगरपालिका बांधकाम विभागाचे अधिकारी व लाइट विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

याठिकाणी तयार होत असलेला रस्ता आठ मीटर असल्याचे कंत्राटदार यांच्या व्यवस्थापकामार्फत सांगण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Mayor Jayashree Mahajan inspecting the road work from Chhatrapati Maharaj Chowk to Pimprala Railway Gate.
Jalgaon News : महामार्ग शेजारी वृक्षारोपण केवळ नावालाच? सावलीसाठी झाडच नाही

महापौर जयश्री महाजन म्हणाल्या, की या रस्त्यावर शालेय विद्यार्थ्यांची वर्दळ, रोज येणारी-जाणारी लोक व मोठ्या प्रमाणावरील वाहतूक पाहता सदरचा रस्ता ८ ऐवजी बारा मीटरचा करण्यात यावा तसेच, रस्त्याची गुणवत्ता सुधारून पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या.

याठिकाणी भविष्यात होणारे अपघात होऊ नये म्हणून रस्त्याच्या मध्यभागी असलेले विद्युत खांब व विद्युत रोहित्र देखील बाजूला करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.

Mayor Jayashree Mahajan inspecting the road work from Chhatrapati Maharaj Chowk to Pimprala Railway Gate.
Jalgaon GMC : मेंदूज्वर झालेल्या महिलेला मिळाले जीवदान; जीएमसीच्या वैद्यकीय पथकाचे यश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com