Latest Marathi News | जळगाव : विद्यार्थ्याला जिवेमारण्याची धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Threat Call

जळगाव : विद्यार्थ्याला जिवेमारण्याची धमकी

जळगाव : शहरातील गणपतीनगर गुरुनानक सोसायटीतील अभिषेक किशन तेजवाणी या विद्यार्थ्यांस मोबाईलवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रामानंदनगर पोलिसांत याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात झाली असून संशयिताचा शोध सुरु आहे. (Latest Marathi News)

अभिषेक किशन तेजवाणी याने दिलेल्या तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे, शुक्रवारी (ता. १२) रात्री आठ वाजता जिशान अखलाख खान (रा. दिक्षीतवाडी) याने त्याच्या मोबाईलवरून फोन केला. काही एक कारण नसताना त्याने अभिषेक याला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक चंद्रकांत पाटील करत आहे.