Jalgaon News: जळगाव तहसील कार्यालयाची सुरक्षा धोक्यात; शासकीय कारभाराचा नमुना समोर

Jalgaon
Jalgaonesakal

जळगाव : ‘शासकीय काम आणि सहा महिने थांब’, असे म्हटले जाते. तसाच अनुभव तहसील कार्यालयाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या सात महिन्यांपासून येत आहे. पडलेल्या भिंतीमुळे तहसील कार्यालयाची सुरक्षा धोक्यात आली आहे.

तहसील कार्यालयातील महत्त्वाची दस्तऐवज केव्हाही चोरीला जाऊ शकतात किंवा त्याला कोणी आग लावू शकते. तहसील कार्यालयातील कागदपत्रे जळाली किंवा चोरी झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Jalgaon
Jalgaon News: जळगावकरांच्या तोंडचे पाणी पळविण्याचा डाव? अमृतच्या प्रस्तावाला महासभेत बगल

सार्वजनिक बांधकाम विभागाला भिंत बांधण्यासह तहसील कार्यालयात प्राथमिक सुविधा करण्याबाबत तब्बल दहा स्मरणपत्रे पाठविली, तर निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनीही दोनवेळा पत्रे पाठविली आहेत. तरीही तहसील कार्यालयाची भिंत बांधण्यात आलेली नाही.

विविध दाखले, विविध परवानग्या, विद्यार्थ्यांसाठी लागणारी प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी तहसीलदार कार्यालयात शहरासह जळगाव तालुक्यातील नागरिकांची दिवसभर गर्दी असते. तहसीलदार कार्यालयाच्या मागील बाजूस (शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या बाजूने) पूर्वी मोठी भिंत होती.

यामुळे तहसील कार्यालयाला मागील बाजूने सरंक्षण होते. उड्डाणपुलाच्या कामात तहसील कार्यालयाची मागील सरंक्षण भिंत पाडण्यात आली. सोबतच सार्वजनिक स्वच्छतागृहही तोडण्यात आले.

हेही वाचा: अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

पुलाचे काम सुरू असताना, बांधकामाचे साहित्य भिंत पाडलेल्या जागेवर असल्याने मागील बाजूने काही प्रमाणात सरंक्षण होते. आता काम पूर्ण झाल्यानंतर संरक्षण गरजेचे होते. याबाबत तहसीलदार कार्यालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला जुलै महिन्यात पत्र देऊन सरंभण भिंत बांधण्यासह विविध सुविधांची कामे करण्यास सांगितले.

मात्र, त्याची दखल घेण्यात आलेली नाही. पावसाळ्यात पाडलेल्या भिंतीच्या बाजूने पाणी तहसील कार्यालयात शिरले होते. पावसाळ्यानंतरही तब्बल दहा स्मरणपत्रे सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविले. मात्र, अद्यापही भिंत बांधण्यात आलेली नाही.

Jalgaon
Jalgaon News : शेतकऱ्यांचे प्रस्ताव परत करणे विमा कंपन्यांना महागात पडणार!

अधिकाधिकच अडचण

एकीकडे भिंत पाडली असल्याने तहसील कार्यालयाला चोरीचा, आगीचा धोका आहे. दुसरीकडे आता महापालिका तहसील कार्यालयाच्या दोन्ही बाजूचे रस्ते, गटारीचे काम करीत आहे. मात्र, हेही काम गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. तहसील कार्यालयासमोर खडीसह इतर साहित्याचे ढीग पडून आहेत.

गटारीवरील ढापा दोन फुट उंच करण्यात आल्याने नागरिकांना कसरत करीत तहसील कार्यालयात जावे लागते. ये-जा करताना अडचण होते. वाहने लावण्यासही जागा नाही. महापालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Jalgaon
Jalgaon News : कोळशाच्या मालगाडीचे 102 दरवाजे उघडे; औष्णिक वीज केंद्राकडून रेल्वेशी पत्रव्यवहार

तहसीलदार येतात पायी...

रस्त्यावर बांधकाम साहित्य पडल्याने मोठी वाहने तहसील कार्यालयाकडे आणता येत नाहीत. तहसीलदारांना जिल्हा परिषदेजवळ गाडी उभी करून पायी तहसील कार्यालयात यावे लागते. जातानाही परत जिल्हा परिषदेपर्यंत पायी जावे लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com