तोंडापूर परिसरात कर्जबाजारी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

शेतीच्या मशागतीसाठी विविध कार्यकारी सोसायटीतून कर्ज काढले होते
Farmer suicide
Farmer suicideSakal
Updated on: 

तोंडापूर (ता. जामनेर) - परिसरातील तोंडापूर व कुंभारी खुर्द येथील शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना गेल्या दोन दिवसांत घडल्या आहेत. तोंडापूर येथील शेतकरी विनोद एकनाथ काकार (वय ३८) यांनी शेतीच्या मशागतीसाठी विविध कार्यकारी सोसायटीतून कर्ज काढले होते. शेतात माल न झाल्याने डोक्यावर कर्ज असल्यामुळे नैराश्य येऊन आपल्या राहत्या घरात सोमवारी विषारी औषधी प्राशन करून आत्महत्या केली. त्यांना पत्नी व एक मुलगा आहे. त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले होते. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी मृत घोषित केले.

दुसऱ्या घटनेत कुंभारी खुर्द येथील शेतकरी बळिराम नथ्थू चव्हाण (वय ४९) यांनी स्वत:च्या मालकीच्या वडाळी शिवारातील गट क्रमांक ४६/३ या शेतात बुधवारी (ता. १) दुपारी तीनला विषारी औषधी प्राशन करून आत्महत्या केली. त्यांना तत्काळ जळगाव येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र तपासणीअंती मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. तोंडापूरसह परिसरात दोन गावांमधील कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेले दोन्ही तरूण असल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची नोंद जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com