Latest Marathi News | सोन्याच्या दरवाढीचा उच्चांक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gold Silver Price Update news

Jalgaon News : सोन्याच्या दरवाढीचा उच्चांक

जळगाव : सोन्याच्या दरात एका दिवसात चारशे रूपयांची वाढ झाली तर चांदीच्या दरात एक हजारांची वाढ (विना जीएसटी) झाली आहे. गेल्या गुरूवारी सोन्याच्या दराने प्रतितोळा ५६ हजारांचा (जीएसटी सह) आकडा पार होता. चांदीचे दरही गुरुवारी ७० हजारांच्या जवळपास पोचले होते.

गेल्या दोन महिन्यांपासून सोने- चांदीच्या दरात प्रचंड चढउतार सुरु आहे. महिनाभरापासून तर हे दर सातत्याने वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील आर्थिक उलाढाली त्याला कारणीभूत असल्या तरी भारतात साधारणतः लग्नसराईच्या हंगामात सोने-चांदीच्या दरात वाढ होते, असे मानले जाते. (Gold prices peak An increase of four hundred in one day Silver prices are also close to 70 thousand on Jalgaon News)

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Eknath Khadse Statement : भूखंड घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

काल सोन्याचे दर ५४ हजार प्रती तोळा तर चांदीचे दर ६७ हजार (विना जीएसटी) होते. आज सोन्याच्या दरात ४०० ची वाढ होवून ते दर ५४ हजार ४०० वर पोचले.

चांदी ६७ हजार (प्रती किलो) वरून ६८ हजारांवर पोचली आहे. सोन्या चांदीतील चढउताराने गुंतवणुकदारही चक्रावले आहे. सोन्या, चांदीच्या दरात केव्हा घट होते याची ते वाट पाहत आहेत.

हेही वाचा: Jalgaon News : जन्मठेप शिक्षेतून 2 महिलांची खंडपीठाकडून निर्दोष मुक्तता