
बोगस डॉक्टरांवर कारवाईची मागणी; विविध वैद्यकीय संघटनांतर्फे निवेदन
चाळीसगाव (जि. जळगाव) : रूग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांचा तालुक्यात सध्या चांगलाच सुळसुळाट आहे. कोणत्याही प्रकारची अधिकृत वैद्यकीय पदवी नसताना अनेक तोतया डॉक्टरांकडून चुकीच्या पद्धतीने उपचार केले जात आहेत. ज्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विविध वैद्यकीय संघटनांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात दिला आहे. (Demand for action against fake doctors)
चाळीसगाव शहरासह तालुक्यात विशेषतः परप्रांतीय बोगस डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कुठल्याही प्रकारची अधिकृत वैद्यकीय पदवी नसलेल्या या तोतया डॉक्टरांकडून चुकीच्या पद्धतीने उपचार केले जाऊन रूग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. बोगस डॉक्टरांची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, चाळीसगाव होमोपॅथिक वैद्यकीय संघटना, चाळीसगाव तालुका जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन आदी वैद्यकीय संघटनांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे यांच्यासह सर्व संबंधितांना दिल्या आहेत. दरम्यान, या निवेदनाची दखल न घेतल्यास, तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील संघटनांनी दिला आहे. निवेदनावर होमिओपॅथी
हेही वाचा: जळगाव पोलिसाची मुंबई पोलिसाला मारहाण; 1 गंभीर
वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजमल कोतकर, ‘नीमा’चे अध्यक्ष डॉ. सुजित वाघ, सचिव डॉ. भरत सुतवणे, तालुका जनरल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. महेश वाणी यांच्यासह शहर व तालुक्यातील सुमारे ८२ डॉक्टरांच्या सह्या आहेत.
हेही वाचा: ग्रामसेवकासह सरपंचपतीस 6 हजारांची लाच भोवली
Web Title: Demand For Action Against Fake Doctors
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..