
जळगाव पोलिसाची मुंबई पोलिसाला मारहाण; 1 गंभीर
जळगाव : देशमुखनगरातील रहिवासी तथा पोलिस दलात असलेल्या दोन्ही भावंडांमध्ये कौटुंबिक कारणातून तुंबळ हाणामारी झाली. मारहाणीत जखमी लहान भावास दुखापत झाल्याने जखमी पोलिस फारुख पठाण यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात मोठा भाऊ, त्याच्या पत्नीसह मेव्हणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon police beat Mumbai police)
कौटुंबिक वादातून फ्रिस्टाईल हाणामारी
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, ‘फारूख खॉ चांदखॉ पठाण (वय ३१) हे मुंबई पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे तर त्यांचा मोठा भाऊ शेरखॉ चांदखॉ पठाण हा जळगाव पोलिस मुख्यालयात नेमणुकीस आहे. शनिवारी (ता.१४) सकाळी फारूख खॉ पठाण त्यांच्या आईच्या नावे असलेल्या देशमुखनगरातील घरी आले होते. तेथे मोठा भाऊ, त्याची पत्नी फिरदोस बानो, बहिण नफिसाबी पठाण आणि पाहुणे रहिम शेख असे, बहिण नफिसाबी याच्या लग्नाचा विषय करत होते. त्या वेळी तुम्ही लहान बहिणीच्या लग्नाविषयी मला का विचारत नाही. यावरून दोन्ही भावंडात तुंबळ हाणामारी होऊन पाहुणे रहिम शेख याने त्यांना मागून पकडून धरले आणि मोठा भाऊ शेरखॉ पठाण याने मारहाण केली तर त्याच्या पत्नीने शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने फारूखखॉ चांदखॉ पठाण यांच्या तक्रारीवरुन मोठा भाऊ शेरखॉ चांदखॉ पठाण, त्याची पत्नी फिरदोस बानो, पाहुणे रहिम शेख एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: Jalgaon : ‘पारलेजी’ म्हणून चिडविले अन् दोन गट आपसांत भिडले
हेही वाचा: ग्रामसेवकासह सरपंचपतीस 6 हजारांची लाच भोवली
Web Title: Jalgaon Police Beat Mumbai Police Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..