Jalgaon News : पाचोरा-एरंडोल बस पूर्ववत करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st bus

Jalgaon News : पाचोरा-एरंडोल बस पूर्ववत करण्याची मागणी

पाचोरा (जि. जळगाव) : येथील आगाराची गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेली सकाळी सातला सुटणारी एरंडोल बस गेल्या काही महिन्यांपासून बंद करण्यात आल्याने विद्यार्थी, विद्यार्थिनी ,ज्येष्ठ नागरिक,

दिव्यांग यांना हाल सोसावे लागत असल्याने ही बस (Bus Service) पूर्ववत सुरू करण्याची मागणी करणारे निवेदन माहिजी येथील ग्रामस्थ व एकरा हायस्कूलच्या पदाधिकारी व शिक्षकांच्यावतीने आगारप्रमुखांना देण्यात आले आहे. (Demand for start again of Pachora Erandol bus jalgaon news)

निवेदनाचा आशय असा, पाचोरा ते एरंडोल ही बस सकाळी सातला सुटून नांद्रा, कुरंगी, माहिजी, बोरनार, म्हसावद मार्गे एरंडोल येथे जात असे. या बसमधून अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला मोठ्या संख्येने प्रवास करत होत्या. परंतु गेल्या काही महिन्यांपासून अचानक ही बस बंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

त्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी बसने प्रवास करावा लागतो. तसेच सवलत असलेल्या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना देखील मनस्ताप व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. हा प्रकार मनमानीचा व अन्यायकारक असून, ही बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.