Jalgaon News : मांडळ येथील 3 सदस्य अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Jalgaon Collector Office
Jalgaon Collector Officeesakal

अमळनेर (जि. जळगाव) : तालुक्यातील मांडळ येथील तीन ग्रामपंचायत सदस्यांनी मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी तिन्ही सदस्यांना अपात्र घोषित केले असून,

तिन्ही सदस्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून घेतलेले लाभ परत घेण्याचे आदेशात म्हटले आहे. (District Collector declared 3 Gram Panchayat members in Mandal ineligible jalgaon news)

जानेवारी २०२१ मध्ये मांडळ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली होती. त्यात हंसराज सुरेश मोरे व विजय सीताराम कोळी हे दोन्ही अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवडून आले होते. तर कविता दीपक नंदवे या नागरिकांच्या मागास प्रवर्ग स्त्री राखीव मतदार संघातून निवडून आल्या होत्या. नियमाप्रमाणे जानेवारी २०२२ पर्यंत त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे होते.

शासनाने कोविड काळात एक वर्ष मुदतवाढ दिल्याने जानेवारी २०२३ पर्यंत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असताना वरील तिन्ही सदस्यांनी प्रमाणपत्र सादर केले नाही. तहसीलदारांनी नोटिसा देऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेचा प्रस्ताव सादर केला होता. दरम्यानच्या काळात मांडळ येथील सरपंचांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले आणि सरपंचपदाची निवड लागली.

मांडळ येथील नागरिकांनी सदस्य अपात्र ठरत असताना सरपंच निवड घेणे चुकीचे म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सरपंच निवडीला स्थगिती दिली आणि जिल्हाधिकाऱ्यांना अपात्रतेबाबत विचारणा केली. तसेच सहा जणांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून तिन्ही सदस्यांना अपात्र करण्याची मागणी केली होती.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

Jalgaon Collector Office
Municipal Election 2023 : प्रदीप रायसोनी पुन्हा उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने तिन्ही सदस्य आपोआप अपात्र ठरतात म्हणून जिल्हाधिकारी मित्तल यांनी मंगळवारी (ता. १४) तिघांना यापुढे ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र घोषित करून त्यांनी घेतलेले लाभ परत घेण्याचा निर्णय दिला आहे.

आडगाव ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व कायम

सासऱ्याने शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यामुळे आशा साबळे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करावे, अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी हे अपील फेटाळून लावल्यामुळे ग्रामपंचायत सदस्याला दिलासा मिळून त्यांचे सदस्यत्व कायम राहिले आहे.

आडगाव ग्रामपंचायतीच्या सदस्या आशा गुलाबराव साबळे यांच्या सासऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केले असल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, असे अपील कल्पना पांडुरंग माळी यांनी जिल्हाधिकारी मित्तल यांच्याकडे केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चौकशी अहवाल पाठविण्याबाबत कळवले होते.

ग्रामपंचायत सदस्या आशा साबळे यांनी अतिक्रमण केल्याचे सिद्ध होत नसल्यामुळे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी अपील फेटाळून लावले.दरम्यान ग्रामपंचायत सदस्या आशा साबळे यांच्याविरुद्ध करण्यात आलेले अपील फेटाळल्याचे वृत्त समजताच ग्रामस्थांनी जल्लोष करून निकालाबाबत समाधान व्यक्त केले. आशा साबळे यांच्यातर्फे ॲड. विश्वासराव भोसले यांनी काम पाहिले.

Jalgaon Collector Office
Anandacha Shidha : 8 दिवसांवर गुढीपाडवा; आनंदाचा शिधा’ची रेशन कार्डधारकांना प्रतिक्षा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com