उसनवारीवरून तरुणावर प्राणघातक हल्ला

कलम वाढविले : तिसरा संशयित अटकेत
demanding borrow money Attack young man
demanding borrow money Attack young man sakal

जळगाव : उसनवारीचे पैसे (usanwari money )मागण्यावरून झालेल्या वादातून एकाला मारहाण करून प्राणघातक हल्ला (Attack) करणाऱ्या दोघ फरार संशयितांना तीन महिन्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी( MIDC police) अटक केली होती. संदीप पाटील व शिवाजी पाटील या दोघांच्या माहितीवरुन त्याचा तिसरा साथीदारास एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी (ता. २८) अटक केली.

demanding borrow money Attack young man
रस्ते, सरकारी जागा अतिक्रमणांच्या विळख्यात

पिकअप चारचाकी वाहनचालक धनराज कोळी (वय २३, रा. हुडको खेडी, बु. ता. जि. जळगाव) याच्यावर भावेश पाटील, संदीप पाटील या दोघा भावंडासह शिवाजी पाटील अशा तिघांनी उसनवारीच्या पैशांवरुन हल्ला चढवून भावेशने चाकूने धनराजवर वार केले. जखमी धनराजच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तीन महिने फरार संदीप पाटील व शिवाजी पाटील अशा दोघांना बुधवारी (ता. २२) अटक केली. अटकेनंतर संशयितांनी दिलेल्या माहितीवरून त्यांचा तिसरा साथीदार भावेश पोपट पाटील याला पोलिस नाईक चेतन सोनवणे, यशोधन ढवळे यांनी अटक केली. दाखल गुन्ह्यात वैद्यकीय अहवालावरुन तपासाधिकारी साहाय्यक निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी (कलम ३०७) प्राणघातक हल्ल्याच्या कलमांची वाढ केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com