Jalgaon : शिवसेनेच्या व्यासपीठावर देवकरांची फटकेबाजी; सभेत पालकमंत्र्यांवर सरकून टीका

Deokar lashing on platform of Shiv Sena
Deokar lashing on platform of Shiv Senaesakal

धरणगाव : ‘‘जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्र्यांनी केवळ भाषणबाजी केली. आम्ही बाप बदलत नाहीत, शिवसेना व उद्धव साहेबांना कधीही सोडणार नाही, असे म्हणणारे हे एकनिष्ठ कार्यकर्ते खोक्यांपुढे डगमगले आणि उद्धव साहेबांना सोडून गद्दारीचा घरोबा केला’’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यासपीठावरून चौफेर फटकेबाजी केली.

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची प्रबोधन यात्रा धरणगाव शहरात होती. त्यावेळी शिवसेनेचे गुलाबराव वाघ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. देवकर यांनी श्रीमती अंधारे यांच्या सभेला हजेरी लावली. सुरुवातीलाच श्री. देवकर यांनी स्पष्ट केले,की शिवसेनेच्या व्यासपीठावर आम्ही जरा अतिक्रमण केले आहे. पण आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळून या ठिकाणी हजेरी लावली. (Deokar lashing on Shiv Sena platform Criticizing Guardian Minister in Meeting Jalgaon Political News)

Deokar lashing on platform of Shiv Sena
Kirankumar Bakale Controversy Case : अशोक महाजन यांचा जामीन अर्ज फेटाळला

कधीही बाप न बदलण्याची भाषा करणाऱ्या आमच्या एकनिष्ठ पालकमंत्र्यांनी पन्नास खोक्यांसाठी आपल्या जबानीला बट्टा लावला, ही जळगाव ग्रामीण मतदार संघातील मतदारांशी घोर प्रतारणा आहे. मंत्रिपद असून देखील विकासाच्या नावाने जिल्ह्यात बोंबाबोंब आहे.

२००९ च्या निवडणुकीत आम्ही जाहीरनाम्यात धरणगावचा उड्डाणपूल अवघ्या दोन वर्षात करण्याची घोषणा केली. त्यावेळी हे महाशय उड्डाणपुल झाला तर मी देवकर आप्पांचा जाहीर सत्कार करेल, अशी भाषा करत होते. मला दोन वर्षे मंत्रिपदाची संधी मिळाली आणि त्याच कालावधीत धरणगावचा उड्डाणपूल उभा करून दाखवला. त्याचेही श्रेय घ्यायला यांनी मागेपुढे पाहिले नाही. पण जनता आता दुधखुळी राहिली नाही.’

Deokar lashing on platform of Shiv Sena
Jalgaon : पोटावरून ट्रॅक्टर गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

‘महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील यांनी पाणीपुरवठा खाते मागून घेतले. राज्यभरातील निविदांचे अधिकार आपल्याला मिळावे, अशीही मागणी त्यांनी केली. अजितदादा उद्धवसाहेबांनी विचार करून त्यांना अधिकार दिले आणि तिथूनच निविदेमागचे गौडबंगाल समोर येऊ लागले. ठेकेदारांना कोणत्या अटीवर ठेके दिले जातात, हे सर्वांना माहीत झाले आहे.

जिल्ह्याच्या या मंत्र्यांकडे पाणीपुरवठा खाते असूनही त्यांच्यात मतदारसंघातील धरणगावसारख्या मोठ्या शहरात वीस - पंचवीस दिवसांआड पाणी येतं याचा अर्थ काय लावायचा? असा टोलाही त्यांनी हाणला.सभेला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, धरणगावचे माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, ईश्वर पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

एक लाखाचे बक्षीस देईन

‘माझ्या मंत्रिपदाच्या काळात गाढोदा, दहिदुल्याचा पूल उभा केला, आताच्या पालकमंत्र्यांनी एक तरी असे काम केल्याचे उदाहरण दाखवावे, त्यांना माझ्याकडून मी एक लाख रुपये बक्षीस देईल, अशा शब्दांत श्री देवकर यांनी पालकमंत्र्यांचा समाचार घेतला.

Deokar lashing on platform of Shiv Sena
Jalgaon : अजिंठा लेणीतील बससेवा सोमवारी बंद; हजारो पर्यटकांचा हिरमोड; प्रशासनाविरोधात रोष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com